MBBS Degree : परदेशातून आलेल्या 27 हजार डॉक्टरांचं भवितव्य धोक्यात; परीक्षेचा निकाल अवघा 21 टक्के

भारतात ‘नीट’ परीक्षा (NEET Exam) देऊन वैद्यकीय प्रवेश निश्‍चित केला जातो.
MBBS Degree
MBBS Degreeesakal
Updated on
Summary

केंद्र सरकारने पात्रता परीक्षेची काठीण्यपातळी वाढवली आहे. ती आवश्‍यक होती. वैद्यकीय सेवा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे.

सांगली : परदेशातून एमबीबीएस (MBBS Degree) केलेल्या विद्यार्थ्यांचा (Students) भारतात सेवा करण्यासाठीच्या पात्रता परीक्षेचा यंदाचा निकाल अवघा २०.८९ टक्के लागला. या वर्षीही ७९ टक्के विद्यार्थ्यांची भारतातील गुणवत्ता ‘बारावी पास’ एवढीच राहण्याची भीती वाढली आहे. अशा पद्धतीच्या शिक्षण व्यवस्थेचा फास आवळतो आहे आणि त्यात अनेक पालक-विद्यार्थी फसत असल्याने या क्षेत्रातील जाणकारांनी चिंता व्यक्त केली आहे.

भारतात ‘नीट’ परीक्षा (NEET Exam) देऊन वैद्यकीय प्रवेश निश्‍चित केला जातो. ज्यांना या परीक्षेत कमी गुण मिळाले आहेत आणि भारतात एमबीबीएसला संधीच मिळत नाही, अशांपैकी काही जण परदेशात शिक्षणाचा निर्णय घेत आहेत. भारतातील विद्यार्थी रशिया, अझर बैजान, कझाकिस्तान, किर्गीस्तान, उझबेकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, चीन, रुमानिया, फिलीपाईन्स, जॉर्जिया या देशांत वैद्यकीय पदवीचे (एम.बी.बी.एस.) शिक्षण घेण्यासाठी जातात.

MBBS Degree
Vishalgad Riots : विशाळगडावरील हिंसक आंदोलनात 2 कोटी 85 लाखांचं नुकसान; गजापुरातील बाधितांना शासनाकडून 25 हजारांची मदत

तेथून शिक्षण पूर्ण करून परतल्यानंतर भारतात थेट सेवा करण्यास मान्यता नाही. त्यासाठी आधी एक पात्रता परीक्षा द्यावी लागते आणि तिची काठीण्यपातळी खूप अधिक आहे. त्यामुळे या परीक्षेचा निकाल सातत्याने कमी लागला आहे. हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधःकारमय झाले आहे. या वर्षी ३४ हजार ६०८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. पैकी केवळ ७ हजार २३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उर्वरित २७ हजार ३७५ विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.

दहा वर्षांची संधी

परदेशातून एमबीबीएस करून आलेल्या विद्यार्थ्यांना भारतात सेवा पात्रता परीक्षेतून पात्र होण्याची संधी साधारण सहावेळा मिळते. प्रवेश घेतल्यापासून दहा वर्षांच्या आत त्यांना पात्र ठरावे लागते. त्यानंतर या विद्यार्थ्यांना सेवा संधी मिळत नाही. एक तर ज्या देशातून शिक्षण पूर्ण केले, त्याच देशात सेवा करावी लागेल किंवा भारतात नव्या संधी शोधाव्या लागतील.

MBBS Degree
Vishalgad Riots : विशाळगड दंगलीचा 'मास्टर माईंड' शोधा, गजापुरात जाळपोळ-हल्ले करणारे शिवभक्त कसे? जयंत पाटलांचा सवाल

गेल्या काळातील निकाल

  • जून २०२१ २३.५३ टक्के

  • डिसेंबर २०२१ २४.२६ टक्के

  • डिसेंबर २०२२ ३२.२१ टक्के

  • जून २०२३ १०.२० टक्के

केंद्र सरकारने पात्रता परीक्षेची काठीण्यपातळी वाढवली आहे. ती आवश्‍यक होती. वैद्यकीय सेवा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. त्यात हलगर्जीपणाला संधी नसायला हवी. विदेशातून वैद्यकीय शिक्षणाचा विचार करताना त्याच्या निकालाच्या टक्केवारीचा पालकांनी जरूर विचार करावा. कारण, विद्यार्थ्यांचे आयुष्य पणाला लागण्याची भीती आहे.

-डॉ. परवेज नायकवडी, वैद्यकीय प्रवेश समुपदेशक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.