पुणे - राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये इयत्ता पाचवी (पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा) आणि आठवीची (पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा) शिष्यवृत्ती परीक्षा ९ फेब्रुवारी २०२५ रोजी एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज परिषदेच्या ‘www.mscepune.in’ आणि ‘https://puppssmsce.in’ संकेतस्थळावर भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शिष्यवृत्तीसाठी नियमित शुल्कासह विद्यार्थ्यांचे अर्ज ३० नोव्हेंबरपर्यंत भरून घेता येणार आहेत.