Municipal Schools : अखेर महापालिकेच्या शाळांना मिळाले मुख्याध्यापक

पुणे महापालिकेत एकूण ३४ गावे समाविष्ट झाली. या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक पुणे महापालिकेत आले
Finally the municipal schools got principal teacher promotion education
Finally the municipal schools got principal teacher promotion educationsakal
Updated on

पुणे : पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागात शिक्षकांच्या सेवा ज्येष्ठतेच्या वादामुळे गेल्या पाच पेक्षा जास्त वर्षापासून शिक्षकांची पदोन्नती झालेली नव्हती. अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिका प्रशासनाने सेवा ज्येष्ठता यादी तयार केली आणि त्यानुसार १३८ शिक्षकांना मुख्याध्यापकपदी, २५ जणांना पर्यवेक्षकपदी पदोन्नती देण्यात आली आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापनात सुधारणा होण्याची शक्यता आहे.

पुणे महापालिकेत एकूण ३४ गावे समाविष्ट झाली. या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक पुणे महापालिकेत आले. त्यामुळे या शिक्षकांची सेवा ज्येष्ठता नोकरीच्या पहिल्या दिवसापासून ग्राह्य धरायची की पुणे महापालिकेत गावे समाविष्ट झाली तेव्हापासून यावरून प्रश्न निर्माण झाला.

Finally the municipal schools got principal teacher promotion education
Teacher Recruitment : महापालिकेच्या शिक्षक भरतीसाठी गर्दी; शाळांमध्ये भरणार २०९ जागा

त्याविरोधात काही शिक्षक संघटनांनी न्यायालयात याचिका दाखल केल्याने गेल्या पाच वर्षापासून सेवा ज्येष्ठता यादी तयारच झाली नाही. सर्वाच्च न्यायालयाने ज्या दिवसापासून शिक्षकांचा नोकरी सुरू केली तो दिवस सेवा ज्येष्ठतेसाठी ग्राह्य धरावा असा निकाल दिला. त्यानंतर पुणे महापालिकेच्या प्रशासन विभागाने शिक्षण विभागाच्या मदतीने शिक्षकांची सेवा ज्येष्ठता यादी तयार केली. त्यामुळे समाविष्ट गावातून आलेल्या शिक्षकांना याचा फायदा झाला.

पुणे महापालिकेच्या शाळांसह खासगी शाळांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पर्यवेक्षकांची जबाबदारी महत्त्वाची असते. यासाठी ३९ जागा असल्या तरी संपूर्ण शहराची जबाबदारी ५ जणांकडेच होता. या पदोन्नतीमुळे आणखी २५ पर्यवेक्षक मिळणार आहेत.

Finally the municipal schools got principal teacher promotion education
School Uniform : मुलींच्या शालेय गणवेशात होणार मोठा बदल; आयोगाची शिक्षण विभागाकडे शिफारस

१३८ शाळा मुख्यध्यापका अभावी

महापालिकेच्या प्राथमिक विभागाच्या २८५ शाळा आहेत. त्यापैकी १३८ शाळांना मुख्याध्यापक नव्हते. शाळेतील ज्येष्ठ शिक्षकाकडे मुख्याध्यापक पदाचा कार्यभार देऊन शाळेचे कामकाज पाहिले जात होते. त्यामुळे या शिक्षकाला स्वतःचा वर्ग सांभाळून शाळेकडेही लक्ष द्यावे लागत होते. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवरही होत होता. सेवा ज्येष्ठतेचा विषय मार्गी लागल्या आता १३८ शाळांना पूर्णवेळ मुख्याध्यापक मिळाले आहेत. तसेच या शिक्षकांना पदोन्नती मिळाल्याने त्यांच्यापेक्षा कनिष्ठ असलेल्या शिक्षकांच्या बढतीचाही मार्ग मोकळा झाला आहे.

‘‘महापालिकेच्या शाळेतील शिक्षकांच सेवा ज्येष्ठता निश्‍चीत करून त्यानुसार मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षकपदी पदोन्नती करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या पाच वर्षानंतर ही पदोन्नती झाली आहे.’’

- विक्रम कुमार, आयुक्त पुणे महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.