मानवी जीवनात संगीताला अनन्य असे स्थान आहे. सुख-दुःखाच्या प्रत्येक प्रसंगांमध्ये संगीत मानवाला साथ देते. याच भारतीय अभिजात संगीताची आणि त्या अनुषंगाने येथे रुजलेल्या संस्कृतीची ओळख संगीतरत्न पंडित कुमार सुरूशे यांनी भारतीय अभिजात संगीत आणि संस्कृती या पुस्तकाच्या माध्यमातून करून दिली असून, डिंपल पब्लिकेशनने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.