उज्ज्वल भविष्याची ‘पायाभरणी’

निवास ही प्राथमिक गरजांपैकी एक गरज असल्याने बांधकाम, स्थापत्यकला व तंत्र याची पायाभरणी फार पूर्वीपासून झाली असावी.
civil engineering
civil engineeringsakal
Updated on

- प्रा. विजय नवले, करिअरतज्ज्ञ

निवास ही प्राथमिक गरजांपैकी एक गरज असल्याने बांधकाम, स्थापत्यकला व तंत्र याची पायाभरणी फार पूर्वीपासून झाली असावी. जगभरातील दर्जेदार वास्तू हा स्थापत्य अभियांत्रिकीच्या (सिव्हिल इंजिनिअरिंग) कर्तृत्वाचा पुरावा आहे. पूर्वी म्हणजे ७०-८० च्या दशकामध्ये इंजिनीअर म्हटलं, की सिव्हिल इंजिनीअर असाच अर्थ व्हायचा.

सिव्हिल शाखेला ‘कोअर ब्रांच’मध्ये समाविष्ट केले जाते. दरम्यान, अन्य अनेक अभियांत्रिकी शाखा विकसित झाल्या. मधल्या काळात अनेक चढ-उतार पाहूनही वेगवेगळ्या आयामांतून सिव्हिल शाखेची प्रगती होताना दिसत आहे, हे मान्य केले पाहिजे.

पदवी व पात्रता

बी.ई./बी.टेक. सिव्हिल इंजिनीअरिंग ही या कार्यक्षेत्रातील पदवी आहे. पदवीचा कालावधी बारावी सायन्सनंतर चार वर्षांचा आहे. डिप्लोमा इंजिनीअरिंगनंतर हा अभ्यासक्रम तीन वर्षांचा आहे. बारावी सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स हे विषय घेऊन बोर्डाच्या परीक्षेत या पीसीएम ग्रुपमध्ये ४५% (४०% मागासवर्गीय प्रवर्गांसाठी) गुण असावेत.

पीसीएम मार्कांचा हा निकष पूर्ण होत नसेल, तर केमिस्ट्री ऐवजी अन्य (व्होकेशनल) विषयांचे मार्क्स विचारात घेता येतात. पीसीएम ग्रुपमध्ये एमएचटी सीईटी प्रवेश परीक्षेमध्ये शून्यापेक्षा अधिक पर्सेन्टाइल असावे. मेरिटसाठी सीईटी/जेईई मेनच्या गुणांचा विचार केला जातो.

अभ्यासक्रमाचे स्वरूप

चार वर्षांच्या अभ्यासक्रमात आठ सेमिस्टर असतात. त्यामध्ये थिअरी लेक्चरबरोबर प्रॅक्टिकल्सचा अंतर्भाव असतो. ड्रॉइंग, सबमिशन, असाइन्मेंट्सच्या माध्यमातून विद्यार्थी घडविला जातो. सातत्याने अंतर्गत, तसेच विद्यापीठीय परीक्षांचे नियोजन केले जाते. टेक्निकल स्पर्धा, पेपर प्रेझेंटेशन, सेमिनार यांचे नियोजन असते.

बांधकामासंदर्भात सर्व्हेयिंग संदर्भात, डिझाईन संदर्भात प्रत्यक्षात कामे पाहण्याची आणि करण्याची संधी मिळते. प्रोजेक्ट वर्क आणि संबंधित तांत्रिकी उपक्रम नीटपणे केल्यास विद्यार्थी पुढील कामासाठी स्पर्धात्मकद्रृष्ट्या तयार होतात. इंटर्नशिप चांगल्या प्रकारे करण्याची संधी मिळाली तर करिअरचा पाया पक्का होतो.

अभ्यासले जाणारे विषय

सर्व्हेयिंग, इंजिनिअरिंग जिऑलॉजी, इंजिनिअरिंग ड्रॉइंग, स्ट्रेंथ ऑफ मटेरिअल्स, हायड्रॉलिक्स, फ्लुइड मेकॅनिक्स, बिल्डिंग मटेरियल्स, कंस्ट्रक्शन, प्लॅनिंग, स्ट्रक्चरल ॲनालिसिस, ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग, हायड्रॉलॉजी, पर्यावरण, फाऊंडेशन इंजिनिअरिंग, कॅड, सिव्हिल डिझाइन सॉफ्टवेअर्स, कॉस्टिंग, जिओटेक्निकल इंजिनिअरिंग, जलव्यवस्थापन, इरिगेशन, सार्वजनिक बांधकाम आदी विषयांचे अध्ययन या अभ्यासक्रमात नियोजित केलेले आहे.

स्कोप करिअरचा

देशात आणि जगभरात लोकसंख्या वाढत आहे. लोकांच्या निवासाच्या गरजेसाठी बांधकाम यंत्रणा मोठ्या प्रमाणात कार्यरत असणे आवश्यक असते. कुटुंब विस्तारत जाताना नव्या घरांची गरज सातत्याने पडत आहे. गाव आणि वस्त्या सुधारत आहेत. उपनगरे विस्तारत आहेत. शहरे मेट्रोसिटीमध्ये रूपांतरित होत आहेत.

घरे, इमारती, बंगले यांपासून आता उंच टॉवर्स, इंडस्ट्रिअल शेड्स, स्मार्टसिटी, कॉर्पोरेट हाऊसेस, आयटी हब विकसित होत आहेत. रस्ते सहापदरी होताना उड्डाणपूल, भूमिगत रस्ते, एक्स्प्रेस-वे मोठ्या प्रमाणात बांधले जात आहेत. त्यामुळे मधल्या काळात जरा साधारण वेगाने प्रगती करणारे सिव्हिल क्षेत्र आता मात्र एक्सप्रेस स्पीडने प्रगती करताना दिसेल अशी शक्यता आहे.

नोकरीच्या संधी/पदे

शासकीय विभागांमध्ये स्पर्धा परीक्षांद्वारे पदे भरली जातात. इरिगेशन, पीडब्ल्यूडी, रस्ते महामंडळे, रेल्वे, स्थानिक स्वराज्य संस्था, ऊर्जानिर्मिती अशा अनेक आस्थापनांमध्ये सिव्हिल इंजिनिअर्स नियुक्त केले जातात. खासगी कंपनीसुद्धा मोठ्या प्रमाणात सिव्हिल इंजिनिअर्सना जबाबदारीच्या पदांवर नेमतात.

इंजिनिअर, कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट मॅनेजर, सर्व्हेअर, साइट इंजिनिअर, कन्स्ट्रक्शन इस्टिमेटर, कन्स्ट्रक्शन शेड्युलर, डिझाइन इंजिनिअर, क्वालिटी मॅनेजर, सेफ्टी इंजिनिअर, इरिगेशन सुपरवायझर, इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनिअर, लँडस्केप डिझाइनर, उपअभियंता, सहाय्यक अभियंता, कॉन्ट्रॅक्टर आदी पदांवर काम करता येते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.