आपल्या सर्वांनाच वेध लागले आहेत ते गणेशोत्सवाचे! गणपती बाप्पांचे आगमन झाल्यावर पुढील काही दिवस आपण सर्व जण बाप्पांसाठी नैवेद्य, त्यांची नित्य पूजाअर्चा यांसह विविध प्रकाच्या सेवेमध्ये रंगून जाणार आहोत. मात्र, या सेवा जशा गणपती बाप्पाला प्रिय आहेत, त्याचप्रमाणे गणपती ही विद्येची देवता असल्याने या कालावधीत केलेली ज्ञानसाधनाही त्यांच्या सेवेचेच एक स्वरूप असून, ही सेवादेखील त्यांना अतिशय प्रिय आहे. त्यामुळेच गणेशोत्सवानिमित्त बाप्पांची ज्ञानसाधनारूपी सेवा करण्यासाठी लक्ष्मण श्रीधर वाकणकर लिखित ‘गणेशविद्या’ या पुस्तकाचे वाचन हा एक चांगला पर्याय ठरू शकतो!