सन 2022-23 या शैक्षणिक वर्षापासून याबाबतचे बदल केले जाणार आहेत.
नवी दिल्ली : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीप्रमाणे (एनडीए) आता मुलींना देशातील पाच मिलिटरी स्कूल (आरएमएस) आणि भारतीय मिलिटरी कॉलेजमध्ये (आरआयएमसी) प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. केंद्र सरकारनं (Central Government) याबाबतचे प्रतिज्ञापत्र बुधवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलंय. त्यानुसार आता महिलांसाठी NDA च्या परीक्षेचं रजिस्ट्रेशन सुरु झालंय.
सन 2022-23 या शैक्षणिक वर्षापासून याबाबतचे बदल केले जाणार असून, मुलींना सैनिकी कॉलेज आणि मिलिटरी स्कूलमध्ये प्रवेश घेता येणार आहे. यानंतर, मुलींना RIMC आणि RMS मध्ये समाविष्ट करून घेतलं जाईल. देहरादूनमधील RIMC साठी 11.5 ते 13 वयोगटातील (Rashtriya Indian Military College RIMS) विद्यार्थिनींना अखिल भारतीय स्तरावरील प्रवेश परीक्षा पास झाल्यानंतर संस्थेत प्रवेश मिळणार आहे.
केंद्र सरकारनं म्हटलंय, की पुढील वर्षी म्हणजे जून 2022 मध्ये विद्यार्थिनींना प्रवेश परीक्षा देण्याची परवानगी आणि त्यानंतर ज्या विद्यार्थिनींनी परीक्षा उत्तीर्ण केली अशा विद्यार्थीनींपैकी जानेवारी 2023 पासून दर सहा महिन्यांनी 5 मुलींना प्रवेश देण्यात येईल. दरवर्षी त्यात 20 टक्के वाढ केली जाईल. मुलींसाठी फिजिकल आणि वैद्यकीय मानांकन व प्रशिक्षण अभ्यासक्रमासह गोपनियता, सुरक्षा प्रदान करण्यासाठी अभ्यासक्रमात बदल केले जाणार आहेत. अधिकार्यांच्या एका समितीकडून सरकारच्या प्रतिज्ञापत्रावर अभ्यास केला जात असून, जेणेकरून मुलींसाठी उपयुक्त अशी पायाभूत रचना तयार केली जाईल. यासाठी न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश प्रतिज्ञापत्राचा अभ्यास करणार आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.