10 वी, 12 वी उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी नोकऱ्यांसाठी अर्ज करण्याची ही उत्तम संधी आहे.
Indian Coast Guard Recruitment 2022 : भारतीय तटरक्षक दलानं आजपासून (4 जानेवारी 2022) नाविक आणि यांत्रिक पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज सुरू केले आहेत. 10 वी, 12 वी उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी नोकऱ्यांसाठी अर्ज करण्याची ही उत्तम संधी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार Joinindiancoastguard.gov.in येथे Join Indian Coast Guard च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
या भरती मोहिमेद्वारे नाविक आणि मेकॅनिकलची एकूण 322 पदं भरली जाणार आहेत. यासाठी पात्र उमेदवार 14 जानेवारी 2022 पर्यंत खालील माहिती काळजीपूर्वक वाचून विहित नमुन्यात अर्ज करू शकतात.
ऑनलाइन अर्जाची सुरुवात - 4 जानेवारी 2022
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख - 14 जानेवारी 2022
टप्पा - 1 परीक्षा - मार्च 2022 (तात्पुरती)
नाविक (जनरल ड्यूटी) : 260 पदे
नाविक (घरगुती शाखा) : 35 पदे
मेकॅनिक (मेकॅनिकल) : 13 पदे
मेकॅनिक (इलेक्ट्रिकल) : 9 पदे
यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स) : 5 पदे
एकूण रिक्त पदांची संख्या - 322 पदे
नाविक (GD) : शालेय शिक्षण मंडळद्वारे (COBSE) मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाकडून गणित आणि भौतिकशास्त्रासह 12 वी उत्तीर्ण (10+2) असावे. वयोमर्यादा : जन्म 1 ऑगस्ट 2000 ते 31 जुलै 2004 च्या दरम्यान असावी.
नाविक (DB) : उमेदवाराने मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून इयत्ता 10 वी उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा : जन्म 1 ऑगस्ट 2000 ते 31 जुलै 2004 दरम्यान असावी.
मेकॅनिकल : उमेदवाराकडे 10 वी पास आणि इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन (रेडिओ/पॉवर) अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा असावा. वयोमर्यादा : 1 ऑगस्ट 2000 ते 31 जुलै 2004 दरम्यान जन्मलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
अर्ज फी : अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवार वगळता सर्व उमेदवारांना 250 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावे.
किती असेल पगार? (Pay Scale)
नाविक (जीडी) आणि नाविक (डीबी) – वेतन स्तर-3 अंतर्गत मूळ वेतन 21700 रुपये
मेकॅनिकल - वेतन स्तर-5 अंतर्गत मूळ वेतन 29200 रुपये असेल. या व्यतिरिक्त, 6200 रुपये आणि लागू भत्ते मिळतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.