Government Job 2023 : बँक ते पोलीस भरती या सगळ्या विभागांत बंपर भरती सुरु आहे. सगळ्या विभागांसाठी पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीखसुद्धा वेगळी आहे. तुम्ही वेगवेगळ्या विभागाच्या तारखा आणि पात्रता अधिकृत वेबसाइटवर चेक करू शकता. तेव्हा तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे ते वेळेत चेक करून लगेच अर्ज करा. परीक्षा आणि पदांबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये क्रेडिट ऑफिसरची पदे रिक्त असून एकूण १०० पदे भरण्यात येणार आहे. यात ५० पदे क्रेडिट ऑफिसर स्केल II चे आहेत तर ५० पदे क्रेडिट ऑफिसर स्केल III चे आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्रच्या bankofmaharashtra.in. या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. अर्जाची शेवटची तारीख ६ नोव्हेंबर असेल. अर्जासाठी ११८० रुपये शुल्क असेल.
छत्तीसगड पोलीससाठी एकूण ६००० पदांची भरती आहे. अर्जासाठी शेवटची तारीख ३० नोव्हेंबर असणार आहे. यासाठी cgpolice.gov.in या अधिकृत वेबसाइटला तुम्ही भेट देऊ शकता. या पदासाठी ५वी ते १०वी उत्तीर्ण उमेदवारसुद्धा अर्ज करू शकतात. यात वयोमर्यादा १८-२७ वर्षे आहे.
नॅशनल हेल्थ मिशन, एमपी मध्ये कम्युनिटी हेल्थ ऑफिसरच्या पदासाठी भरती सुरु आहे. यात एकूण ९८० पदांची भरती होणार असून अर्जाची शेवटची तारीख १६ नोव्हेंबर आहे. अर्जासाठी तुम्हाला nhmmp.gov.in. या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
काही काळापूर्वी पंजाब सबऑर्डिनेट सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डाने जेई, असिस्टंट-कम-इन्स्पेक्टर अशा अनेक पदांसाठी भरती जाहीर केली होती. त्यांच्यासाठी अर्जाची लिंक पुन्हा उघडण्यात आली आहे. तुम्ही या पदांसाठी आज म्हणजेच २८ ऑक्टोबर २०२३ पर्यंत अर्ज करू शकता. या भरती मोहिमेद्वारे 345 पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्यासाठी, पंजाब सबऑर्डिनेट सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. (ssb.punjab.gov.in.)
MPSC अंतर्गत प्राध्यापक पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागणी करण्यात आली आहे. ही भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्यात आली असून एकूण २१४ सहायक प्राध्यापक पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 9 नोव्हेंबर 2023 आहे. अर्ज फक्त ऑनलाइन असतील, त्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. (mpsc.gov.in.) निवड केल्यास पगार एक लाखापेक्षा जास्त आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.