Govt Job : कोणत्याही परीक्षेशिवाय मिळवा सरकारी नोकरी! ऑइल इंडियामध्ये इतक्या पदावर होतेय भरती

Oil India Recruitment 2024 Latest News: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ऑईल इंडिया कंपनीच नोकरीची सुवर्णसंधी आहे.
Jobs in Oil India Recruitment 2024
Jobs in Oil India Recruitment 2024
Updated on

सरकारी नोकरी मिळवण्याची इच्छा असणार्यांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. ऑइल इंडिया या कंपनीत तब्बल ४० पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यासाठी तरुणांना कुठलीही परीक्षा द्यावी लागणार नाही. ऑइल इंडिया लिमिटेडमध्ये होणार असलेली ही भरती लेखी परीक्षा नाही तर थेट वॉक इन प्रॅक्टिकल किंवा स्किल टेस्टच्याआधारे केली जाणार आहे.

कोणत्या पदांवर होणार भरती?

ऑइल इंडियामध्ये इलेक्ट्रिशियन, मॅकेनिक (एसी आणि आर), असोसिएट इंजिनियर (इलेक्ट्रिकल) या पदांसाठी ४० जागा रिक्त आहेत. या भरतीसाठी अर्जप्रक्रिया सुरु करण्यात आली असून उमेदवारांना कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागणार आहे. २१ ऑक्टोबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

Jobs in Oil India Recruitment 2024
Nitin Gadkari : गडकरींनी फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना का दिली होती गोळ्या घालण्याची धमकी? स्वतःच सांगितला किस्सा

इलेक्ट्रिशियन पदासाठी १८ जागा रिक्त आहेत. मेकॅनिकसाठी २ जागा रिक्त आहेत. असोसिएट इंजिनियर पदासासाठी २० रिक्त जागा आहेत. या नोकरीसाठी २० ते ४० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या पदांसाठी उमेदवारांची निवड ही वॉक इन प्रॅक्टिकल/स्किल टेस्टद्वारे केली जाणार आहे. तसेच उमेदवारांचे वैयक्तिक मूल्यांकन देखील केले जाणार आहे.

Jobs in Oil India Recruitment 2024
Video : शाळेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांनी गायलं 'अयि गिरि नन्दिनी'; नेटकरी झाले मंत्रमुग्ध, येथे पाहा Viral Video

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.