नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाने एकूण २३५ फ्लाइंग ब्रँच आणि ग्राउंड ड्युटी टेक्निकल आणि नॉन-टेक्निकल शाखांमध्ये भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. या पदांनुसार शारीरिक आणि शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार ३० डिसेंबरपर्यंत अर्ज करू शकतात. या मध्ये फ्लाइंगच्या ६९, ग्राउंड ड्युटी टेक्निकलच्या ९६ तर ग्राउंड ड्युटी नॉन-टेक्निकलच्या ७० पदांचा समावेश आहे.
पद | संख्या |
फ्लाइंग | ६९ |
ग्राउंड ड्यूटी टेक्निकल | ९६ |
ग्राउंड ड्यूटी नॉन-टेक्निकल | ७० |
पात्रता -
- फ्लाइंग ब्रँच - १० + २ गणित आणि भौतिकशास्त्रात किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण किंवा कोणत्याही शाखेतून किमान ६० टक्के गुणांसह पदवी परीक्षा उत्तीर्ण किंवा बी.ई. किंवा बी.टेक किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण.
- ग्राउंड ड्युटी नॉन-टेक्निकल - प्रशासन आणि लॉजिस्टिकसाठी किमान ६० टक्के गुणांसह पदवी उत्तीर्ण, अकाउंट्ससाठी किमान ६० टक्के गुणांसह बी.कॉम. उत्तीर्ण
वय -
- फ्लाइंग ब्रँच - २० ते २४ वर्षे
- ग्राउंड ड्यूटी टेक्निकल आणि नॉन-टेक्निकल - 20 ते 26 वर्षे
वेतन -
फ्लाइंग ऑफिसरसाठी ५६,१०० ते १,७७,५०० रुपये
अर्ज करण्याची अंतिम तारीख-
३० डिसेंबर २०२०
अर्ज कसा करावा -
अर्ज करण्यासाठी भारतीय हवाई दलाच्या अधिकृत वेबसाइट afcat.cdac.in ला भेट द्या. आणि ऑनलाइन अर्ज करू शकता.
निवड प्रक्रिया -
या सर्व पदांसाठी पात्र आणि कुशल उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी आणि वैद्यकीय तपासणीनंतर तयार केलेल्या गुणवत्ता यादीनुसार केली जाईल.
अधिक माहितीसाठी येथे ► क्लिक करा
- एज्युकेशन-जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.