सरकारी नोकरीची अपेक्षा ठेवून असलेल्या उमेदवारांसाठी ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये (JCI) नोकरीची संधी.
सरकारी नोकरीची (Government Jobs)) अपेक्षा ठेवून असलेल्या उमेदवारांसाठी ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये (Jute Corporation of India - JCI) नोकरीची संधी. भारत सरकारच्या (Government of India) वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या (Ministry of Textiles) अंतर्गत असलेली सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (JCI) ने कनिष्ठ निरीक्षक, कनिष्ठ सहाय्यक आणि लेखापाल यांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. 24 डिसेंबर 2021 रोजी कंपनीने जारी केलेल्या भरती (Recruitment) जाहिरातीनुसार सर्व तीन पदांच्या एकूण 63 रिक्त जागांसाठी विहित निवड प्रक्रियेद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. यामध्ये कनिष्ठ निरीक्षकाची 40 पदे, कनिष्ठ सहाय्यकाची 11 पदे आणि लेखापालाची 12 पदे आहेत. (Government jobs in various positions in Jute Corporation of India)
असा करा अर्ज
ज्यूट कॉर्पोरेशन भरती 2022 (Jute Corporation Recruitment 2022) साठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार कंपनीच्या अधिकृत वेबसाइट jutecorp.in वर प्रदान केलेल्या ऑनलाइन फॉर्मद्वारे अर्ज करू शकतात. 24 डिसेंबरपासून अर्जाची प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवार 13 जानेवारी 2022 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत अर्ज सादर करू शकतील. ऑनलाइन अर्जादरम्यान सामान्य श्रेणी, OBC श्रेणी आणि EWS श्रेणीतील उमेदवारांना 200 रुपये शुल्क देखील भरावे लागेल, जे ऑनलाइन माध्यमातून भरता येईल. तथापि, SC, ST, दिव्यांग आणि माजी कर्मचारी वर्गातील उमेदवारांना शुल्क जमा करण्याची गरज नाही.
भरतीसाठी पात्रता व निकष
लेखापाल : मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा इतर कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेतून M.Com पदवी उत्तीर्ण आणि संबंधित कामाचा पाच वर्षांचा अनुभव. सात वर्षांचा अनुभव असलेले B.Com असलेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात.
कनिष्ठ सहाय्यक : मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा इतर कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेतून पदवी किंवा समकक्ष पात्रता. तसेच, संगणकावर इंग्रजीमध्ये किमान 40 शब्द प्रतिमिनिट टायपिंगचा वेग असावा.
कनिष्ठ निरीक्षक : मान्यताप्राप्त मंडळातून बारावी उत्तीर्ण आणि तीन वर्षांचा अनुभव.
सर्व पदांसाठी 1 डिसेंबर 2021 रोजी उमेदवारांचे वय 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे. तथापि, राखीव श्रेणीतील उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादेत सूट आहे, भरतीशी संबंधित अधिक तपशिलासाठी ज्यूट कॉर्पोरेशन भरती 2022 ही अधिसूचना पाहा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.