एसएसएलसी परीक्षेसाठी (SSLC Exam) ८.६९ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४.४१ लाख मुले आणि ४.२८ मुलींनी परीक्षा दिल्याची माहिती आहे.
बंगळूर : पुढील वर्षापासून दहावीच्या (10th SSLC Exam) परीक्षेत ग्रेस मार्क देण्याची पद्धत रद्द करण्याच्या सक्त सूचना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. विधानसौध येथे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
यावर्षी विद्यार्थ्यांना २० ग्रेस गुण दिले आहेत. कोणत्या कारणासाठी आणि हेतूने ग्रेस मार्क्स दिले आहेत. तुम्हाला ग्रेस मार्क्स देण्यास कोणी सांगितले, असा सवाल सिध्दरामय्या (CM Siddaramaiah) अधिकाऱ्यांना केला.
विद्यार्थ्यांच्या हितासाठी शिक्षण विभागाने (Education Department) उत्तीर्णतेसाठी किमान गुण ३५ वरून २५ वर आणले आहेत. मात्र, निकाल कमी लागणे चिंतेचे कारण बनले आहे. १.७० लाख विद्यार्थ्यांना ग्रेस गुण दिले आहेत.
कर्नाटकातील दहावी परीक्षा २५ मार्च ते ६ एप्रिल दरम्यान झाली होती. एसएसएलसी परीक्षेसाठी (SSLC Exam) ८.६९ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४.४१ लाख मुले आणि ४.२८ मुलींनी परीक्षा दिल्याची माहिती आहे. यामध्ये ४१,३७४ रिपिटर आणि ५,४२४ दिव्यांग विद्यार्थ्यांचा समावेश आहे. २,७५० परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा झाली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.