पुणे : राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत शासकीय आयटीआयमध्ये ९१.८५ टक्के जागांवर प्रवेश पूर्ण झाले आहेत. तर खासगी आयटीआयमध्ये केवळ ५५.५१ टक्के जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याचे निदर्शनास आले आहे. अद्यापही आयटीआय प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना ३१ डिसेंबरपर्यंत प्रवेश घेण्याची संधी व्यवसाय व प्रशिक्षण संचालनालयाने उपलब्ध करून दिली आहे.
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अंतर्गत येणाऱ्या या प्रवेश प्रक्रियेत शासकीय आयटीआयमधील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा ओढा सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे. शासकीय आयटीआयमध्ये ९३ हजार ७६३ जागा आणि खासगी आयटीआयमध्ये ५६ हजार ४३६ जागा अशा एकूण एक लाख ५० हजार १९९ जागा प्रवेशासाठी उपलब्ध होत्या. प्रवेश प्रक्रियेतंर्गत आतापर्यंत शासकीय आयटीआयमध्ये ८६ हजार १२४ विद्यार्थ्यांनी, तर खासगी आयटीआयमध्ये ३१ हजार ३२८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. अजूनही खासगी आयटीआयमधील जवळपास २५ हजार जागा रिक्त आहेत. या जागांवर प्रवेश करण्यासाठी दिल्ली येथील प्रशिक्षण महासंचालनालयाच्या परिपत्रकानुसार विद्यार्थ्यांना पुन्हा एक संधी देण्यात आली आहे.
अशी आहे स्थिती
प्रवेशासाठी एकूण नोंदणी : ३,४४,२९४
अर्ज पूर्ण भरलेले विद्यार्थी : ३,१५,३००
प्रवेश अर्ज शुल्क भरलेले विद्यार्थी : ३,०८,४४८
विकल्प अर्ज सादर केलेले विद्यार्थी : २,४९,४८१
अर्ज दुरुस्त केलेले विद्यार्थी : १८,७२२
आतापर्यंतच्या प्रवेशाचा तपशील (शैक्षणिक वर्ष २०२१-२२)
तपशील : शासकीय आयटीआय : खासगी आयटीआय : एकूण
प्रवेशासाठी उपलब्ध जागा : ९३,७६३ : ५६,४३६ : १,५०,१९९
पहिल्या फेरीत झालेले प्रवेश : २३,७९७ : ६,६९५ : ३०,४९२
दुसऱ्या फेरीत झालेले प्रवेश : १२,९९८ : २,२०६ : १५,२०४
तिसऱ्या फेरीत झालेले प्रवेश : १२,१९२ : २,७१५ : १४,९०७
चौथ्या फेरीत झालेले प्रवेश : ८,३१८ : १,३५३ : ९,६७१
संस्थास्तरावरील प्रवेश : --- : ५,४१९ : ५,४१९
समुपदेशन फेरीतील प्रवेश : २८,८१९ : १२,३१४ : ४१,१३३
एकूण प्रवेश : ८६,१२४ : ३१,३२८ : १,१७,४५२२२२
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.