प्रांजल गुंदेशा
सध्याच्या धकाधकीच्या काळात समोर येणारा प्रत्येक दिवस अधिकाधिक व्यग्र असतो. त्यामुळे अशा धावपळीतही कुटुंबातील सर्वांनी एकमेकांसाठी वेळ काढणं खूप आव्हानात्मक असलं, तरी आवश्यक ठरतं. आनंदी व सुखी जीवन जगणाऱ्या मोजक्या कुटुंबांना यामागचे गुपित कळलेले असते. त्यांना कुटुंबाच्या दिनचर्येचे महत्त्व समजलेले असते. प्रत्येक कुटुंबाची एक दिनचर्या असते. सर्व जण त्या त्या वेळी ती ती कामे करत असतात. त्यामुळे जर ती दिनचर्या छान योग्य पद्धतीने तयार केली गेली असेल, तर नक्कीच त्याचा सर्वांना फायदा होतो. एकमेकांमधील बंध अधिक दृढ होतात. कुटुंबातील प्रत्येक घटक अधिकाधिक समृद्ध होत जातो. सुखी कुटुंबाच्या काही महत्त्वाच्या सवयी