Holidays : ट्रीप झालीचं पाहिजे! ऑक्टोबरमध्ये शाळांना असणार इतके दिवस सुट्टी!

पुढील महिना या वर्षातील सर्वाधिक सुट्ट्या असणारा महिना आहे.
School
School Sakal
Updated on

Holidays In October 2022 : पुढील महिना या वर्षातील सर्वाधिक सुट्ट्या असणारा महिना आहे. कारण या महिन्यात अनेक सण उत्सव असून, अनेक पालकांनी या सुट्ट्यांसाठी आतापासूनच नियोजन आखण्यास सुरूवात केली आहे.

School
'भारती'ने भरवली भुतांची 'पिकनिक'

ऑक्टोबर शासकीय सुट्ट्या 9 तर रविवार धरून एकूण 11 सुट्ट्या असल्याने विद्यार्थ्यांना केवळ 20 दिवसच शाळेत जावे लागणार आहे. ऑक्टोबरमध्ये गांधी जयंती, दसरा आणि दीपावली हे सण आहेत. या महिन्यात 2,9,16,23 आणि 30 असे पाच रविवार आहेत.

School
मुंबईकरांनो चाललंय काय ? मुंबईतल्या दोन नंबरच्या हॉटस्पॉटमध्ये पिकनिक मूड...

अशा आहेत ऑक्टोबरमधील सुट्ट्या

  • 2 ऑक्टोबर - महात्मा गांधी जयंती (रविवार) 5 ऑक्टोबर - दसरा (बुधवार)

  • 8 ऑक्टोबर - मिलाद उन-नबी (शनिवार)

  • 9 ऑक्टोबर - महर्षि वाल्मिकी जयंती (रविवार)

  • 23 ऑक्टोबर - नरक चतुर्दशी (दिवस रविवार)

  • 24 ऑक्टोबर - दीपावली (सोमवार)

  • 25 ऑक्टोबर - वसूबारस ( मंगळवार)

  • 26 ऑक्टोबर - भाऊबिज ( बुधवार)

  • 30 ऑक्टोबर - रविवार

School
मुलांचा आयक्यू लेव्हल वाढवण्यासाठी पालकांनी 'या' गोष्टी खास लक्षात ठेवाव्या

यावर्षी 53 दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार आहेत. त्यात 2022 मध्ये एकूण 52 रविवार आहेत. दोन्हींची एकत्र बेरीज केल्यास सुमारे 105 दिवस होत आहेत. मात्र, सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये 4 सुट्ट्या रविवारी आल्या आहेत. त्यामुळे शाळा 101 दिवस बंद राहणार आहेत. या सुट्यांमध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा समावेश करण्यात आलेला नसून, उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा जर यामध्ये समावेश केला तर, सुट्ट्यांची संख्या दीडशेहून अधक होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.