HSC Result: बारावीनंतर नोकरी करायची आहे ? रेल्वेमध्ये करा उत्तम करिअर, टीटीई होण्यासाठी अशी करा तयारी

Career In Railways : भारतीय रेल्वेमध्ये टीटीई या पदावर दरवर्षी भरती केली जाते.
Career In Railways
Career In Railwaysesakal
Updated on

Career In Railways : भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करण्यासाठी अनेक तरूण उत्सुक असतात. भारतीय रेल्वेमध्ये विविध प्रकारचे डिपार्टमेंट आहेत. दरवर्षी या विभागांमध्ये विविध पदांवर भरती केली जाते, त्यासाठी अनेक तरूण अप्लाय करत असतात.

तुम्हाला फक्त या  विविध विभागांच्या वेबसाईट्सवर नजर ठेवावी लागते आणि सतत अपडेट्स चेक करावे लागतात. रेल्वे विभागामध्ये टीटीई या पदांवर ही दरवर्षी भरती केली जाते.

मात्र, अनेकांना टीटीई हे पद नेमके आहे काय? आणि टीटीई झाल्यानंतर नेमके काय काम करावे लागते? याची माहिती नसते. त्यामुळे, आज आपण टीटीई करिअर संदर्भातली माहिती जाणून घेणार आहोत.

Career In Railways
Career Tips : करिअरमध्ये अपयशाची चिंता न करता शिकत राहणे महत्वाचे; ठेवा सकारात्मक दृष्टिकोन

टीटीई म्हणजे नेमके काय?

रेल्वे विभागातील एक प्रमुख पद म्हणून टीटीई पदाला ओळखले जाते. अनेक जण टीसी आणि टीटीई या दोन्ही पदांमध्ये गोंधळून जातात. अनेकांना असे वाटते की, टीटीई आणि टीसी हे सारखेच आहेत. मात्र, असे अजिबात नाही.

टीटीई म्हणजे ट्रॅव्हलिंग तिकीट एग्जामिनर (प्रवास तिकीट परीक्षक) टीटीईचे प्रमुख काम हे आहे की, रेल्वेमध्ये प्रवाशांची तिकीटे चेक करणे. टीसी हा देखील तिकीट चेक करण्याचे काम करतो. मात्र, टीसी रेल्वे स्टेशनवर तिकीट चेक करतो आणि टीटीई हा रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे तिकीट चेक करण्याचे काम करतो.

भारतीय रेल्वेमध्ये या टीटीई पदाच्या नोकरीसाठी असंख्य तरूण अर्ज करत असतात आणि परीक्षेची तयारी देखील करतात.

उमेदवाराची पात्रता

रेल्वेमध्ये टीटीईच्या पदासाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे १८ ते ३० वर्षांपर्यंत असावे. तसेच, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट दिली जाते. प्रमुख बाब म्हणजे उमेदवाराने ५०% गुणांसहीत १२ वी उत्तीर्ण असणे महत्वाचे आहे.

टीटीईसाठी अशी करा तयारी

टीटीईच्या पदावर नोकरी करण्यासाठी तुम्हाला एक लेखी परीक्षा द्यावी लागते. या लेखी परीक्षेत १५० प्रश्नांची उत्तरे उमेदवाराला द्यावी लागतात. ज्यामध्ये, जनरल नॉलेज, तर्क-वितर्क, गणित इत्यादी विषयांशी निगडीत प्रश्नांचा समावेश असतो.

या परीक्षेच्या तयारीसाठी तुम्ही पुस्तकांची मदत घेऊ शकता आणि त्यासोबतच तुम्ही मागच्या वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवू शकता. यामुळे, तुमची चांगली तयारी होण्यास मदत होईल.

उमेदवाराने टीटीईची लेखी परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर त्याला शारीरिक क्षमता चाचणी द्यावी लागते. या चाचणीमध्ये पास झाल्यानंतर उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाते आणि त्यांची निवड केली जाते.

Career In Railways
SSC GD Constable : दहावी पास उमेदवारांसाठी केंद्रीय सशस्त्र दलामध्ये नोकरीची सुवर्णसंधी; ७५,७६८ पदांवर भरती सुरू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()