मुंबई : Research and Analysis Wing (RAW)मध्ये अधिकारी आणि प्रतिनिधींची नेमणूक विविध मार्गांनी होते. त्यापैकीच एक म्हणजे भारतीय लोकसेवा आयोगाची परीक्षा म्हणजेच UPSC Civil Services Exam (Group-A IAS, IPS, IRS & IFS Officers). भारताच्या भोवतालच्या देशांमधील राजकीय आणि लष्करी घडामोडींवर लक्ष ठेवणे हे रॉच्या प्रतिनिधींचे काम असते.
रॉ ही भारताची परदेशी गुप्तचर यंत्रणा असते. त्यांचे प्राथमिक कार्य परदेशी गुप्तचर माहिती गोळा करणे, दहशतवादविरोधी प्रचार, भारतीय धोरणकर्त्यांना सल्ला देणे आणि भारताच्या परकीय धोरणात्मक हितसंबंधांना पुढे नेणे हे आहे. भारताच्या आण्विक कार्यक्रमाच्या सुरक्षिततेही रॉची भूमिका महत्त्वाची ठरते.
भारतातील सशस्त्र दले, गुप्तचर संस्था, पोलीस सेवा, प्रशासकीय सेवा, इत्यादी विविध विभागांतून रॉसाठी अधिकारी निवडले जातात; पण याचा अर्थ असा नव्हे की केवळ याच सेवांमधून अधिकारी निवडले जातात.
उत्तम शैक्षणिक कामगिरी आणि लक्षणीय अनुभव या गोष्टीही रॉमध्ये दाखल होण्यासाठी आवश्यक असतात. रॉमध्ये दाखल होणे सोपे नाही. यासाठी उमेदवारी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असावा लागतो.
रॉसाठी आवश्यक पात्रता
मान्यताप्राप्त संस्थेमधून पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. तीक्ष्ण बुद्धिमत्ता आणि उत्तम संवादकौशल्य असणे आवश्यक असते. काही वेळा एखादी परदेशी भाषा अवगत असणेही आवश्यक असते. रॉसाठी कोणतीही ठरावीक वयोमर्यादा नसली तरीही संबंधित व्यक्ती ५६ वर्षांखाली असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे २० वर्षांच्या कामाचा अनुभव असणे अनिवार्य आहे. उमेदवार हा भारताचा नागरिक असावा. तसेच त्याला गुन्हेगारी पार्श्वभूमी नसावी. त्याच्याशी संबंधित न्यायालयीन प्रकरणे प्रलंबित नसावीत.
UPSC Civil Services Examमधून रॉसाठी निवड
भारतीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन आयपीएस, आयएएसची निवड केलेल्या उमेदवारांमधून रॉसाठी निवड केली जाते. Lal Bahadur Shastri National Academy of Administration मधून फाऊंडेशन कोर्स पूर्ण केल्यानंतरच रॉसाठी निवड होते. मानसशास्त्रीय चाचण्या आणि मुलाखतीही घेतल्या जातात. रॉच्या प्रमुखांची नियुक्ती पंतप्रधानांच्या अखत्यारीत सचिव म्हणून होते. यात संसदेचा हस्तक्षेप नसतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.