पुणे - यंदा बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये ७५ ते ९० टक्के आणि त्यापेक्षा अधिक गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तुलनेने जास्त आहे. त्यामुळे पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशातील चुरस वाढण्यास ते महत्त्वपूर्ण कारण ठरेल. शहरातील सर्वोत्तम महाविद्यालयांमध्ये पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश हवा असेल, तर विद्यार्थ्यांचे गुणही तसेच सर्वोत्तम लागतील.
कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (सीआयएससीई), केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) पाठोपाठ आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत ७० टक्के आणि त्यापेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे.
राज्य मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेत ९० टक्के आणि त्यापेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या आठ हजार ७८२ आहे. तर, ७५ टक्के आणि त्यापेक्षा जास्त गुण मिळविणारे एकूण एक लाख ९२ हजार ५५४ विद्यार्थी आहेत. यंदाही ९० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच शहरातील नामांकित महाविद्यालयात पहिल्या यादीत प्रवेश मिळेल. पण तरीही ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये चांगलीच चुरस रंगण्याची शक्यता आहे.
प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाची वैशिष्ठ्ये
विज्ञान शाखेत कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, गणित, संख्याशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र याला पसंती
व्यावसायिक आणि कौशल्यप्रधान अभ्यासक्रमांना महत्त्व
इंटिग्रेटेड कोर्सेसला विद्यार्थ्यांकडून प्राधान्य
बी. व्होक अभ्यासक्रमांना मिळणार पसंती
वाणिज्य शाखेत वाढती मागणी, यांसह सीए, सीएस वाढती मागणी
कला शाखेत मानसशास्त्रातून पदवी करण्याला पसंती
ओपन अँड डिस्टन्स लर्निंगच्या माध्यमातून शिकणाऱ्या
विद्यार्थ्यांची संख्या वाढणार
टक्केवारीनिहाय विद्यार्थी संख्या
८,७८२ - ९० टक्के आणि त्यापेक्षा अधिक
२८,७५३ - ८५ टक्के आणि त्यापेक्षा अधिक
६०,१६५ - ८० टक्के आणि त्यापेक्षा अधिक
९४,८५४ - ७५ टक्के आणि त्यापेक्षा अधिक
१,२८,७७१ - ७० टक्के आणि त्यापेक्षा अधिक
१,६०,२२७ - ६५ टक्के आणि त्यापेक्षा अधिक
२,०५,९५८ - ६० टक्के आणि त्यापेक्षा अधिक
५,४८,४१० - ४५ टक्के आणि त्यापेक्षा अधिक
१,५१,२१५ - ४५ टक्क्यांपेक्षा कमी गुण
शिक्षण महाग वाटणारे आणि चांगले गुण असणारे विद्यार्थी विद्यापीठाच्या ‘स्कूल ऑफ ओपन ॲण्ड डिस्टन्स लर्निंग’मध्ये नोकरी करता-करता शिक्षण घेण्याला प्राधान्य देतील. तर आर्थिक अडचण नसणारे आणि बारावीत विशेष श्रेणी, ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळालेले बहुतेक विद्यार्थी पदवीसाठी व्यावसायिक आणि कौशल्यप्रधान अभ्यासक्रमाची निवड करतील. पारंपारिक पदवी अभ्यासक्रमाबरोबरच बी.व्होकेशनलचा पर्यायही विद्यार्थ्यांच्या पसंतीस उतरत आहे.
- डॉ. राजेंद्र झुंजारराव, प्राचार्य, मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय (शिवाजीनगर)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.