HSC Result: बारावीत सर्व विषयात १०० टक्के गुण मिळवून तनिषानं घडवला इतिहास! असा केला अभ्यास

Sambhaji Nagar Tanisha Bormanikar Score 100 Percent : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा महाराष्ट्रातून बारावीची परीक्षा तब्बल १४ लाख २३ हजार ९७० विद्यार्थ्यांनी दिली होती.
Sambhaji Nagar Tanisha Bormanikar Score 100 Percent
Sambhaji Nagar Tanisha Bormanikar Score 100 Percent Esakal
Updated on

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा महाराष्ट्रातून बारावीची परीक्षा तब्बल १४ लाख २३ हजार ९७० विद्यार्थ्यांनी दिली होती. त्यापैकी ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलं आहे. या परीक्षेमध्ये महाराष्ट्रातील संभाजीनगरच्या एका विद्यार्थीनीने १०० टक्के गुण मिळवले आहेत. संभाजीनगरच्या तनिषा बोरमणीकर या विद्यार्थीनीने हे यश मिळवले आहे.

तनिषा ही छत्रपती संभाजीनगरमधील देवगिरी कॉलेजमध्ये शिकत होती. बारावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवणारी तनिषा ही एकमेव मुलगी आहे. तनिषाना १०० टक्के गुण मिळाल्याने तिच्या कुटुंबियांनी आंनद व्यक्त केला आहे. तनिषाचे शिक्षक, कुटुंबियांनी तिच्या या यशाबाबत कौतुक केलं आहे.

Sambhaji Nagar Tanisha Bormanikar Score 100 Percent
Maharashtra Board 12th Result 2024: प्रतीक्षा संपली ! HSC बारावीचा निकाल जाहीर, मार्क्स किती मिळाले ? एका क्लिकवर पाहा रिझल्ट

तनिषाने बोलताना सांगितले की, तिला ९५ टक्के गुण मिळतील, अशी आशा होती. मात्र, १०० टक्के मिळाल्याने तिला खूप आनंद झाला आहे. तीने वर्षभर अकाउंट्स या विषयाचा अभ्यास केला. त्या विषयावर जास्त भर दिला. शेवटच्या दोन महिन्यात तिने बाकीच्या विषयांचा अभ्यास केला. तिला तिच्या शिक्षकांनी खूप साथ दिली. ती बुद्धिबळ खेळायची. त्यामुळे तिचा अभ्यास बुडायचा. तिला तिच्या शिक्षकांनी आणि कॉलेजने खूप सपोर्ट केला. ती खेळामुळे कॉलेजला जास्त जाऊ शकले नाही. पण शिक्षकांच्या सपोर्टने तिने हे यश प्राप्त केल्याचं तिने यावेळी बोलताना सांगितले आहे.

Sambhaji Nagar Tanisha Bormanikar Score 100 Percent
HSC Result: बारावीत नापास झालाय? टेन्शन नॉट! हे कोर्स ठरू शकतात लाईफ चेंजर

तनिषाचा आवडता विषय अकंउट्स होता. त्यात तिला ९५ मार्क्स मिळाले. तिला ओसीएम, इकोनॉमिक्स आणि पाली या विषयात १०० मार्क्स मिळाले आहेत.

बारावीच्या परिक्षेत एकूण ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाच्या वर्षी राज्यात मुलींनी बाजी मारली आहे. या वर्षी १४ लाख २३ हजार ९७० विद्यार्थ्यांनी बारावीची परिक्षा दिली होती. त्यापैकी एकूण १३ लाख २९ हजार ६८४ विद्यार्थी पास झाले आहेत. यावर्षी एकूण ९१.६० टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. राज्यात कोकण विभागात ९७.५१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.

Sambhaji Nagar Tanisha Bormanikar Score 100 Percent
Latur 12th Exam Result : लातूर विभागाचा पॅटर्नचं वेगळा! यंदाही मुली ठरल्या अव्वल, विभागाचा 92.36 टक्के निकाल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.