श्रीगोंदे (नगर) - बारावीच्या सुरू असलेल्या ऑफलाईन परीक्षेत आजचा गणिताचा पेपर फुटला आहे. श्रीगोंद्यातील विद्यार्थ्यांना पेपर सुरू होण्यापूर्वी सुमारे पाऊण तास उत्तरासहित प्रश्नपत्रिका यांच्या मोबाईलच्या व्हॉट्सअप वर आल्याने एकच खळबळ उडाली. याबाबत गट शिक्षण विभागाने मोबाईलवर आलेली प्रश्नपत्रिका व परीक्षेची प्रश्नपत्रिका एकच असल्याचा दुजोरा दिला आहे. (Mathematics paper leaked in ahmednagar)
याबाबतची अधिक माहिती अशी कोरोना च्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी परीक्षा झाली नाही. यावर्षी ऑफलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला. आज सकाळी साडेदहा वाजता गणित या विषयाची पेपर होता. मात्र तत्पूर्वीच सुमारे पावणे दहा वाजनेच्या सुमारास श्रीगोंद्यातील विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर ही प्रश्नपत्रिका उत्तरासहित मिळाली होती. अर्थात त्याचे उगमस्थान श्रीगोंदे की दुसरे कुठे हे समजण्यास मार्ग नसला तरी गणिताचा पेपर फुटला हे वास्तव नाकारता येत नाही. (HSC Paper Leak News)
उत्तरासहित प्रश्नपत्रिका आल्याने हा पेपर काही काळ अगोदरच फुटला असावा याला दुजोरा मिळत आहे. याबाबत श्रीगोंद्यातील बारावीच्या परीक्षेची माहिती घेतली असता श्रीगोंद्यात नियमानुसार दरवर्षी सहा परीक्षा केंद्र असतात परंतु आता कोरोना पार्श्वभूमीवर यांची संख्या वाढून १७ ठिकाणी हे परीक्षा केंद्र आहेत. या परीक्षेसाठी तालुक्यात सुमारे तीन हजार विद्यार्थी बसले असून मोबाईलवर सोशल मीडियातुन प्रश्नपत्रिका उत्तरासहित वितरित झाल्याने गोंधळ उडाला आहे.
दरम्यान याबाबत शिक्षण विभाग तसेच परीक्षेला असणाऱ्या शिक्षकांना कुठलीच माहिती नसल्याचे समजते. मात्र सदर प्रतिनिधीने यांच्याकडे याबाबत प्रश्न पत्रिका पाठवून विचारणा केली असता फुटलेली प्रश्नपत्रिकाही परीक्षेतील असल्याचे सांगण्यात आले.
यापूर्वी एका विषयाची प्रश्नपत्रिका फुटल्याची चर्चा आज सुरू असून सगळ्याच सावळागोंधळ समोर येत असल्याचं असल्याने या प्रकाराची चौकशी होण्याची मागणी पालकांमधून होत आहे.
दरम्यान याबाबत पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सुनील वाळके यांना विचारले असता त्यांनी खात्री करून मोबाईलवर आगोदर मिळालेले प्रश्नपत्रिका परीक्षेतील एकच असल्याचे मान्य केले.मात्र हा प्रकार श्रीगोंद्यातील झाला नसल्याचा दावाही त्यांनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.