HSC Result 2024 : २५ हजार ९६७ विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आज फैसला

बारावीचा निकाल दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीने होणार जाहीर
HSC Result 2024
HSC Result 2024 Sakal
Updated on

Akola News : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी (ता. २१) दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे. या परीक्षेसाठी जिल्ह्यातून २५ हजार ९६७ विद्यार्थी बसले होते.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात येणारी बारावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी पासून घेण्यात आल्या. बारावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातील एकूण २५ हजारांवर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. नियमित, खासगीरित्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसह इतर विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. जिल्ह्यातील एकूण ८७ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पार पडली. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या एक तास अगोदर परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला.

परीक्षेत काेणत्याही प्रकारचा गैरप्रकार हाेवू नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न हाेऊ नये म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी यांनी परीक्षा केंद्र व केंद्रांच्या बाहेरील १०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केला होता.

दरम्यान महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल २१ मे रोजी जाहीर करण्यात येईल. त्यामुळे निकालाबाबत परीक्षार्थी, पालक व शिक्षकांमध्ये उत्सुकता लागली आहे.

शाखानिहाय परीक्षा देणारे विद्यार्थी

शाखा - संख्या

विज्ञान- १४४६५

कला -८३३४

वाणिज्य -२१२२

व्होकेशनल -१०४८

एकूण- २५,९६७

प्रत्येक विद्यार्थ्यासाठी निकाल महत्वाचा असतोच. पण बारावीचा निकाल म्हणजे आयुष्यातील यशाचे मोजमाप नाही. आपल्या स्कीलच्या आधारावर अनेक जण मोठे झाले आहेत. मिळालेल्या गुणपत्रकाकडे सकारात्मक पाहावे. पालकांनी मुलांना धीर द्यायला हवा. पालकांनी पाल्यांच्या इच्छेचा आदर करायला पाहिजे. पालकांनी आपल्या इच्छा आकांक्षा मुलांवर न थोपवता त्यांच्या आवडत्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रोत्साहन द्यायला पाहिजे.

— डॉ. सुचिता पाटेकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक विभाग) जि. प. अकोला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.