HSC Result : पत्रकार व्हायचंय? 12वी नंतर काय कराल? वाचा एका क्लिकवर

समाजात घडणाऱ्या घटना सामान्य लोकांना सोप्या शब्दांमध्ये सांगण्याचे काम पत्रकार करत असतो. तुम्हाला जर पत्रकार व्हायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
journalist
journalist Sakal
Updated on

How to become a Journalist: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकताच बारावीचा निकाल जाहीर केला आहे. ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बारावीच्या निकालात यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. बारावी झाली की विद्यार्थांच करिअर नवं वळण घेतं. तुम्हाला जर पत्रकार व्हायचे त्यासाठी कोणती पात्रता असते, अभ्यासक्रम कोणता असतो आणि त्यात संधी कोणत्या आहेत हे सांगणार आहोत.

पत्रकार हा समाजातील घटना सामान्य लोकांना सोप्या शब्दात सांगण्याच काम करतो. तसेच सरकार आणि समान्य जनतेमधला दुवा मानला जातो. कारण सामान्य लोकांच्या समस्या सरकारपर्यंत पोहोचवण्याच काम पत्रकार करतो. यासाठी वृत्तपत्र, रेडिओ, टेलिव्हिजन आणि आता सोशल मिडिया या प्रमुख माध्यांचा वापर करतो. पत्रकारितेची पदवी घेऊन त्यात करिअर करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी बॅचलर ऑफ जर्नालिजम ही पत्रकारितेची पदवी प्राप्त करावी लागते.

पत्रकार होण्यासाठी कोणती पात्रता

विद्यार्थ्याने कोणत्याही शाखेत बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

राज्यस्तरावरील कोणतीही सीईट या प्रवेशासाठी नाही.

पण काही संस्था त्यांच्या स्तरावर प्रवेश परिक्षा घेऊ शकतात.

बारावीनंतर तीन वर्षांचा हा अभ्यासक्रम आहे.

मराठी आणि इंग्रजी या दोन्ही माध्यमांमध्ये अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

तसेच मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांवर प्रभूत्व असावे.

journalist
HSC Result 2024 : 12th Science नंतर कोणते क्षेत्र निवडावे? पहा एकापेक्षा एक भारी कोर्स

अभ्यासक्रमातील विषय

पत्रकारितेची ओळख, भाषांवर प्रभूत्व, अर्थशास्त्र,समाजशास्त्र, प्रशासन यांची सविस्तर माहिती,पत्रकारितेचा इतिहास आणि वाटचाल, बातमीचा शोध, वार्तालेखन,वार्तांकन, संपादन, वृत्तनिवेदन,प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, फोटोजर्नालिजम,क्राईम रिपोर्टिंग,पत्रकारितेशी संबंधित संस्थांचा अभ्यास अग्रलेख, जाहिराशास्त्र यासारख्या अनेक विषयांचा अभ्यास पत्रकारितेमध्ये शिकविला जातो.

नोकरीची संधी

तुम्ही पदवी प्राप्त झाल्यावर पत्रकार,वृत्तनिवेदक,प्रुफरीडर, स्तंभ लेखक, कटेंट रायटर, सहसंपादक,संपादक अशा अनेक संधी मिळतात. तुम्हाला जर आवड असेल तर या क्षेत्रात यश मिळवू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.