स्थापत्य अभियांत्रिकीच्या जवळ जाणारा, परंतु अभियांत्रिकी प्रकारापेक्षा बराच वेगळा असणारा अभ्यासक्रम म्हणजे स्थापत्यशास्त्र (आर्किटेक्चर). प्रत्यक्ष वास्तू जरी स्थापत्य अभियंते बांधत असले, तरी त्या पाठीमागचा विचार वास्तुविशारदाचा असतो. वास्तू नुसतीच दणकट असून पुरत नाही, तर ती उपयुक्त आणि देखणी असावी लागते.