UPSC Success Story : गुगलची लाखोंची नोकरी सोडली अन् बनला युपीएससी टॉपर ; ना टिना डाबी ना सृष्टी देशमुख, कोण आहे हा IAS अधिकारी?

IAS Anudeep Durishetty : आज आम्ही एका अशा तरुणाची गोष्ट सांगणार आहोत ज्याने यूपीएससीच्या इतिहासातच नवा विक्रम केला. ज्याने गुगलची लाखोंची नोकरी सोडून यूपीएससी टॉप केली.
IAS Officer Anudeep Durishetty From Google Engineer to UPSC Topper
IAS Officer Anudeep Durishetty From Google Engineer to UPSC Topperesakal
Updated on

Google Employee to UPSC topper : देशातील सर्वात कठीण परीक्षा म्हणून ओळखली जाणारी यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण करणे हे प्रत्येक स्पर्धार्थीचे स्वप्न असते. सध्या आयएएस पद रद्द झालेल्या पूजा खेडकर चर्चेत आहेत. पण या परीक्षेत मेहनत करून खरोखरच यश मिळवणाऱ्या अनेकांची नावं तुम्ही ऐकली असतील. पण आज आम्ही एका अशा तरुणाची गोष्ट सांगणार आहोत ज्याने यूपीएससीच्या इतिहासातच नवा विक्रम केला. त्याचे नाव आहे अनुदीप दुरीशेट्टी.

अनुदीपने २०१७ मध्ये यूपीएससीची परीक्षा अव्वल क्रमांकाने उत्तीर्ण केली. त्याने या परीक्षेत सर्वोच्च गुण मिळवण्याचाही विक्रम केला. त्यांनी एकूण २०२५ पैकी ११२६ गुण मिळवले.

अनुदीपने बीट्स पिलानीतून पदवी पूर्ण केल्यानंतर गुगलमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम केले. चांगल्या पगाराची लाखोंची नोकरी असूनही त्यांना देशसेवा करण्याची इच्छा होती.

IAS Officer Anudeep Durishetty From Google Engineer to UPSC Topper
China Secret Spacecraft : चीनने अंतराळात सोडलेल्या 'सिक्रेट' वस्तूमुळे जग चिंतेत; नेमकं काय आहे प्रकरण?

त्यांनी २०१२ मध्ये पहिली आणि २०१३ मध्ये दुसरी यूपीएससीची परीक्षा दिली. पण त्यांना यश मिळाले नाही. त्यानंतर २०१३ मध्ये त्याची निवड आयकर सेवेत झाली. पण त्यांच्या मनात आयएएस बनण्याचे स्वप्न होते.

त्यांनी हार न मानता पुन्हा २०१४ आणि २०१५ मध्ये यूपीएससीची परीक्षा दिली. शेवटी २०१७ मध्ये त्यांनी पाचव्या प्रयत्नात यश मिळवले आणि तसेच ते अव्वल आले. विशेष म्हणजे त्यांनी कोणत्याही कोचिंगशिवाय हे यश मिळवले. सध्या तो हैदराबादचे जिल्हाधिकारी आहेत.

IAS Officer Anudeep Durishetty From Google Engineer to UPSC Topper
Preeti Sudan: UPSC च्या अध्यक्षपदी प्रीती सुदान, कोरोना काळात देशाला सावरणाऱ्या यूपीएससीला पोखरणाऱ्या 'विषाणू'ला संपवतील?

या यशात त्याच्या कुटुंबाचा मोठा वाटा आहे. त्यांनी त्याला आर्थिक आणि मानसिक आधार दिला. त्यांच्या या प्रवासातून आपण ध्येय निश्चितता, कठोर परिश्रम आणि कुटुंबाच्या पाठिंबा यांचे महत्व समजून घेऊ शकतो.

आयएएस अनुदीपची ही प्रेरणादायी कहाणी नक्कीच तरुण पिढीसाठी मार्गदर्शक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.