IBPS Clerk Recruitment 2022 : देशभरात ६०३५ पदांवर भरती

अर्ज करण्यासाठी, उमेदवाराकडे सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयातील पदवी असणे आवश्यक आहे.
IBPS
IBPSgoogle
Updated on

मुंबई : Institute of Banking Personnel Selection ने IBPS Clerk 2022 भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. नोंदणी प्रक्रिया देखील सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख २१ जुलै आहे. या भरतीद्वारे लिपिकाची ६०३५ पदे भरली जाणार आहेत.

IBPS
National Awards To Teachers साठी अर्ज करण्याच्या अंतिम मुदतीत वाढ

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार IBPS च्या अधिकृत वेबसाइट ibps.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. उमेदवारांसाठी पूर्वपरीक्षा सप्टेंबर २०२२ मध्ये घेतली जाईल आणि मुख्य परीक्षा ऑक्टोबर २०२२ मध्ये घेतली जाईल. पात्रता, निवड प्रक्रिया आणि इतर माहिती खाली दिली आहे.

कोणत्या राज्यात किती पदांची भरती होणार ?

अंदमान आणि निकोबार - ०४, आंध्र प्रदेश - २०९, अरुणाचल प्रदेश - १४, आसाम - १५७, बिहार - २८१, चंदीगड - १२, छत्तीसगड- १०४, दादर नगर / दमण दीव- ०१, दिल्ली NCT - २९५, गोवा- ७१, गुजरात- ३०४, हरियाणा - १३८, हिमाचल प्रदेश- ९१, जम्मू आणि काश्मीर - ३५.

झारखंड- ६९, कर्नाटक - ३५८, केरळ- ७०, लक्षद्वीप - ०५, मध्य प्रदेश - ३०९, महाराष्ट्र- ७७५, मणिपूर- ०४, मेघालय- ०६, मिझोराम - ०४, नागालँड - ०४, ओरिसा- १२६, पुडुचेरी- ०२, पंजाब - ४०७, राजस्थान- १२९, सिक्कीम - ११, तामिळनाडू - २८८, तेलंगणा- ९९, त्रिपुरा - १७, उत्तर प्रदेश- १०८९, उत्तराखंड - १९, पश्चिम बंगाल - ५२८, एकूण पदांची संख्या: ६०३५

IBPS
करिअरचे पूर्वनियोजन का महत्त्वाचे आहे ?

पात्रता

अर्ज करण्यासाठी, उमेदवाराकडे सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयातील पदवी असणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी किमान वय २० वर्षे आणि कमाल वय २८ वर्षे आहे.

निवड अशी होईल

निवड प्रक्रियेमध्ये पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा यांचा समावेश असेल. जे उमेदवार पूर्व परीक्षेत पात्र ठरतील ते मुख्य परीक्षेला बसण्यास पात्र असतील.

IBPS भरती २०२२ : लिपिक भरतीसाठी अर्ज कसा करावा.

पायरी १ : सर्व प्रथम IBPS च्या अधिकृत वेबसाइट ibps.in ला भेट द्या.

पायरी २ : मुख्यपृष्ठावर 'Click here to apply online for common recruitment
process for clerk XII (CRP-Clerks-XII)' येथे क्लिक करा.

पायरी ३ : आता नवीन नोंदणी लिंकवर क्लिक करा आणि नोंदणी करा.

पायरी ४ : त्यानंतर पृष्ठावर परत जा आणि नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड सबमिट करून लॉग इन करा.

पायरी ५ : आता तुमचा अर्ज भरा.

पायरी ६ : संबंधित कागदपत्रे, छायाचित्र आणि स्कॅन केलेली स्वाक्षरी अपलोड करा.

पायरी ७ : अर्ज फी भरा.

पायरी ८ : तुमचा फॉर्म सबमिट केला जाईल, त्याची प्रिंटआउट घ्या आणि ती तुमच्याकडे ठेवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()