IBPS मध्ये ऑफिसर पदांसाठी मोठी भरती; 'या' तारखेपर्यंत करता येणार अर्ज

Government Job
Government Jobesakal
Updated on
Summary

बँकिंग कर्मचारी निवड संस्थेच्या वतीने विविध पदांसाठी नुकतेच अर्ज मागविण्यात आले आहेत.

IBPS Recruitment 2021 : बँकिंग कर्मचारी निवड संस्थेच्या (Institute of Banking Personnel Selection) वतीने विविध पदांसाठी नुकतेच अर्ज मागविण्यात आले आहेत. IBPS च्या या भरतीअंतर्गत सहाय्यक प्राध्यापक, फॅकल्टी रिसर्च असोसिएट, रिसर्च असोसिएट, हिंदी ऑफिसर, आयटी इंजिनीअर (डेटा सेंटर), आयटी डेटाबेस अॅडमिनिस्ट्रेटर, सॉफ्टवेअर डेव्हलपर आणि टेस्टर (फ्रंटएंड, बॅकएंड) या पदांची भरती केली जाणार आहे. दरम्यान, या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 1 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे, तर 14 ऑक्टोबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असेल, असं संस्थेनं स्पष्ट केलंय.

Government Job
SBI बँकेत पदवीधरांसाठी बंपर भरती; 600 हून अधिक पदांवर मिळणार 'नोकरी'

दरम्यान, ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे, ते अधिकृत वेबसाइटला ibps.in भेट देऊन तपशील तपासू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 1 ऑक्टोबरपासून सुरू होत असून 14 ऑक्टोबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या कालावधीतनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

महत्वाच्या तारखा

  1. ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख - 1 ऑक्टोबर 2021

  2. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 14 ऑक्टोबर 2021

  3. परीक्षेची तारीख - ऑक्टोबर/नोव्हेंबर 2021

IBPS Recruitment 2021 : रिक्त पदांचा तपशील

  • सहाय्यक प्राध्यापक

  • फॅकल्टी रिसर्च असोसिएट

  • रिसर्च असोसिएट

  • हिंदी ऑफिसर

  • आयटी इंजिनीअर (डेटा सेंटर)

  • आयटी डेटाबेस अॅडमिनिस्ट्रेटर

  • सॉफ्टवेअर डेव्हलपर आणि टेस्टर (फ्रंटएंड, बॅकएंड)

Government Job
आर्मीत पदवीधरांसाठी नोकरीची उत्तम संधी; महिला-पुरुष दोघेही करू शकतात अर्ज

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शनने जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार, विविध पदांसाठी उमेदवारांचे वय 21 ते 40 वर्षांदरम्यान असावे. याशिवाय आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार यात शिथिलता दिली जाईल. उमेदवाराकडे संबंधित क्षेत्रातील पदवी, तसेच कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा महाविद्यालयातून यूजी, पीजी, पीएचडी पदवी असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवारांना निवडीसाठी लेखी परीक्षा द्यावी लागेल. लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना मुलाखतीच्या फेरीला उपस्थितही राहावं लागेल. सर्व उमेदवारांसाठी अर्ज फी 1000 रुपये आहे. ही फी ऑनलाइन पद्धतीने भरता येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()