IBPS Recruitment : ६ बँकांमध्ये हजारो पदांवर भरती प्रक्रिया सुरू

या भरतीद्वारे ६ हजार ४३२ रिक्त जागा भरल्या जातील. या वर्षाच्या अखेरीस प्रिलिम्स, मुख्य परीक्षा आणि मुलाखत घेण्यात येईल.
IBPS Recruitment
IBPS Recruitmentgoogle
Updated on

मुंबई : Institute of Banking Personnel Selection (IBPS) ने प्रोबेशनरी ऑफिसर आणि मॅनेजमेंट ट्रेनी (IBPS PO रिक्रुटमेंट 2022) च्या पदांसाठी भरती अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. या पदांसाठी इच्छुक असलेले सर्व उमेदवार आजपासूनच IBPS च्या अधिकृत वेबसाइट ibps.in वर जाऊन अर्ज करू शकतात.

या भरतीद्वारे ६ हजार ४३२ रिक्त जागा भरल्या जातील. या वर्षाच्या अखेरीस प्रिलिम्स, मुख्य परीक्षा आणि मुलाखत घेण्यात येईल. प्रिलिम्सच्या कामगिरीच्या आधारे उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी बोलावले जाईल आणि मुख्य परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना मुलाखतीच्या फेरीसाठी बोलावले जाईल.

IBPS Recruitment
UPSC : ४ भावंडांनी उत्तीर्ण केली यूपीएससी; आता आहेत IAS आणि IPS

IBPS PO भरती २०२२ रिक्त जागांचा तपशील

एकूण पदे – ६,४३२

१. बँक ऑफ इंडिया - ५३५ पदे.

२. कॅनरा बँक - २५०० पदे.

३. पंजाब नॅशनल बँक - ५०० पदे.

४. पंजाब आणि सिंध बँक - २५३ पदे.

५. UCO बँक - ५५० पदे.

६. युनियन बँक ऑफ इंडिया - ८३६ पदे.

IBPS Recruitment
Life skills : हुशार लोक या चुका नेहमी टाळतात; म्हणूनच त्यांची होते वाहवा...

वयोमर्यादा

जे उमेदवार १ ऑगस्ट २०२२ रोजी २०-३० वर्षे वयोगटातील असतील ते उमेदवार अर्ज करू शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत अतिरिक्त सवलत दिली जाईल.

शैक्षणिक पात्रता

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. यासोबतच उमेदवारांकडे अचूक गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र असावे.

अर्ज शुल्क

सामान्य श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ८५० रुपये भरावे लागतील तर SC, ST आणि PWD श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून १७५ रुपये भरावे लागतील.

निवड प्रक्रिया

या पदांवर निवड होण्यासाठी उमेदवारांना तीन टप्प्यांतून जावे लागते. पहिल्या टप्प्यात प्रिलिम्स परीक्षा, दुसऱ्या टप्प्यात मुख्य परीक्षा आणि तिसऱ्या टप्प्यात मुलाखत होईल. प्रिलिम्स परीक्षा एक तासाची असेल ज्यासाठी उमेदवारांना १०० गुण दिले जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.