ICSE Board Exam : नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या परिक्षांबाबत पेचप्रसंग निर्माण झाला आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता अनेक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी लावून धरण्यात येत आहे. देशाला कोरोनाचा पुन्हा विळखा पडलेला असताना केंद्र सरकारने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा दिला होता. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची अर्थात सीबीएसई बोर्डाची बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे, तर दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय बुधवारी (ता.१४) जाहीर करण्यात आला होता. अगदी त्याच धरतीवर आता CISCE च्या ICSE आणि ISE च्या परिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचं पत्र CISCE ने जाहीर केलेलं आहे.
कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टीफिकेट एक्झामिनेशन्स (सीआयएससीई) तर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी (आयसीएसई) आणि बारावीच्या (आयएससी) परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला. या परीक्षा ४ मेपासून सुरू होणार होत्या.
कोरोनामुळे निर्माण झालेल्या सद्य:स्थितीचा विचार करून CISCE ने दहावी-बारावीच्या २०२१ मध्ये होणाऱ्या परीक्षांना तुर्तास स्थगिती दिली आहे. या बोर्डाच्या परीक्षांबाबत अंतिम निर्णय जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत घेण्यात येणार आहे, अशी माहिती सीआयएससीईच्या वतीने देण्यात आली आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या पुढील तारखा कळविण्यात येतील. तर दहावीच्या विद्यार्थ्यांना बारावीच्या विद्यार्थ्यांसह ऑफलाइन परीक्षा देण्याचा किंवा ऑफलाइन परीक्षा न देण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांनी ऑफलाइन परीक्षा न देण्याचा पर्याय निवडल्यास अशा विद्यार्थ्यांचा योग्य आणि नि:पक्षपातीपणे निकाल देण्यासाठी CISCE तर्फे निकष विकसित करण्यात येतील, अशी माहिती CISCE ने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
CBSE बोर्डाची परिक्षा रद्द करण्यात आल्यानंतर अशी शक्यता वर्तवली जात होती की लवकरच CISCE ची 10 वी बोर्डाची ICSE परीक्षा देखील रद्द करण्यात येईल. तर 12 बोर्ड अर्थात ISC बाबत तितकीशी स्पष्टता नव्हती कारण आतापर्यंत कोणत्याच बोर्डाने बारावीची परीक्षा रद्द केलेली नाहीये. फक्त IB बोर्डाने आपल्या दोन्ही परीक्षा रद्द केल्या आहेत.
ICSE आणि ISC ची बोर्ड परीक्षा आधी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार 12 च्या विद्यार्थ्यांची 4 मेपासून तर 10 वीच्या विद्यार्थ्यांची 5 मेपासून सुरु होणार होती. मात्र आता या दोन्ही परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन या परीक्षांबाबतचा निर्णय बोर्डाकडून जूनच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येईल, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.