आयडॉल : उद्यापासून पदवी व पदव्युत्तर प्रथम वर्ष अभ्यासक्रमाचे प्रवेश

Mumbai-University
Mumbai-Universitysakal media
Updated on

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai university) दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या १७ अभ्यासक्रमास (Degree syllabus) युजीसी-डीईबीने (UGC-DEB) शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या प्रवेशासाठी नुकतीच मान्यता दिली (Admission permission) आहे. यानुसार आयडॉलच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाचे प्रवेश (First year admission starts) उद्यापासून (२७ ऑक्टोबर २०२१ ) पासून सुरू होत आहेत. मागील वर्षी कोविडची साथ असतानाही आयडॉलमध्ये १५ अभ्यासक्रमामध्ये ६४ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. आयडॉलमध्ये यूजीसीच्या निर्देशानुसार सीबीसीएस सत्र पद्धत सुरु करण्यात करण्यात आलेली आहे.

Mumbai-University
एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 112 कोटींचा निधी; उपमुख्यमंत्र्यांचा निर्णय

पदवीस्तरावरील प्रथम वर्ष बीए, बीकॉम, बीएस्सी आयटी,बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स हे अभ्यासक्रम व पदव्युत्तर स्तरावरील प्रथम वर्ष एमए ( इतिहास, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, भूगोल, मराठी,हिंदी, इंग्रजी), एमए शिक्षणशास्त्र, एमकॉम, एमएस्सी आयटी या अभ्यासक्रमाचे प्रवेश आजपासून सुरू होत असून प्रवेश अर्ज भरण्याची शेवटची तारीख २० नोव्हेंबर २०२१ आहे. हे प्रवेश ऑनलाईन असून, विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या https://old.mu.ac.in/distance-open-learning/ या संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

यावर्षी यूजीसीनी मुंबई विद्यापीठाला बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स, एमए भूगोल व एमएमएस-एमबीए या तीन नवीन अभ्यासक्रमांना परवानगी दिली आहे.एआयसीटीई व यूजीसीने आयडॉलला एमएमएस-एमबीए व एमसीए या अभ्यासक्रमाला दूरस्थ माध्यमातून सुरू करण्यास परवानगी दिली आहे.यानुसार एमएमएस-एमबीए व एमसीए या अभ्यासक्रमासाठी आयडॉल लवकरच प्रवेश परीक्षा घेणार आहे. एआयसीटीईने आयडॉलला एमएमएस-एमबीए साठी ७२० जागा तर एमसीएसाठी २००० जागांना मान्यता दिली आहे.

विभागीय उपकेंद्रावर मार्गदर्शन आयडॉलचे चर्चगेट, ठाणे, कल्याण व रत्नागिरी येथे विभागीय केंद्रे असून याठिकाणी प्रवेशासंबंधी मार्गदर्शन व अध्ययन साहित्याचे वितरण होणार आहे. लवकरच सावंतवाडी व पालघर येथेही विभागीय केंद्र सुरू होत आहेत. तसेच विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वर्षापासून गुणपत्रिका देखील या उपकेंद्रावर मिळतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.