आयडॉल सुरु करणार 'मास्टर ऑफ मॅनेजमेंट' स्टडीजचा अभ्यासक्रम

Mumbai University
Mumbai UniversitySakal
Updated on

मुंबई : मुंबई विद्यापीठाची दूर व मुक्त अध्ययन संस्था ( आयडॉल ) दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज म्हणजेच (MMS) हा व्यवस्थापनाचा महत्वाचा अभ्यासक्रम (Important Syllabus) लवकरच सुरु करण्यात येणार आहे. यासाठी विद्यापीठाच्या विद्वत परिषदेने नुकतीच मान्यता दिली आहे. त्यामुळे युजीसी-डीईबीने(UGC-DEB) मान्यता दिल्यानंतर हा अभ्यासक्रम सुरु केला जाणार असल्याची माहिती आज आयडॉल कडून देण्यात आली.( Idol starts master of management Studies syllabus)

Mumbai University
काँग्रेसमध्ये कुठलेही अंतर्गत वाद नाहीत - नाना पटोले

दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून सुरु होणारा व्यवस्थापन शाखेचा एमएमएस हा अभ्यासक्रम दोन वर्षाचा असून तो चार सेमिस्टर मध्ये विभागाला गेला आहे. आयडॉल व नियमित महाविद्यालयाचा एमएमएसचा अभ्यासक्रम सारखाच आहे. विद्यापीठाच्या विद्वत परिषदेने या अभ्यासक्रमाला मान्यता दिली आहे. यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या डिस्टन्स एज्युकेशन ब्युरोकडे पुढील मान्यतेसाठी पाठविला जाईल. त्यांची मान्यता मिळाल्यानंतर हा एमएमएस अभ्यासक्रम पुढील शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून सुरु करण्याचा मानस आहे, असे आयडॉलचे संचालक डॉ. प्रकाश महानवर यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.