SSC ने जारी केल्या CGL भरतीच्या अर्जदारांसाठी महत्त्वाच्या सूचना

SSC ने जारी केल्या CGL भरतीच्या अर्जदारांसाठी महत्त्वाच्या सूचना
SSC ने जारी केल्या CGL भरतीच्या अर्जदारांसाठी महत्त्वाच्या सूचना
SSC ने जारी केल्या CGL भरतीच्या अर्जदारांसाठी महत्त्वाच्या सूचनाSakal
Updated on
Summary

कर्मचारी निवड आयोगाने (SSC) CGL भरती 2021 (संयुक्त पदवी स्तर) संदर्भात एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे.

कर्मचारी निवड आयोगाने (Staff Selection Commission - SSC) CGL भरती 2021 (संयुक्त पदवी स्तर) (CGL Recruitment 2021) (Combined Graduate Level) संदर्भात एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे. SSC ने म्हटले आहे, की CGL भरती परीक्षा 2021 साठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या तरुणांनी अर्ज करण्यासाठी शेवटच्या तारखेची (23 जानेवारी 2022) प्रतीक्षा करू नये. तुमचा अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी सबमिट करा. वास्तविक, अर्जाची शेवटची तारीख आणि त्यापूर्वी काही दिवस वेबसाइटवर प्रचंड ट्रॅफिक असते. त्यामुळे अर्ज करताना तांत्रिक समस्या निर्माण होतात. अशा परिस्थितीत उमेदवारांनी शेवटच्या तारखेची वाट पाहू नये, त्यापूर्वी अर्ज करावा, असा सल्ला आयोगाने दिला आहे. उमेदवार एसएससीच्या अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात. SSC CGL 2021 टियर-1 परीक्षा (संगणक आधारित चाचणी) एप्रिल 2022 मध्ये होईल. भारत सरकारच्या (Government of India) विविध मंत्रालये, विभाग, संस्थांमध्ये () रिक्त असलेल्या गट ब आणि गट क स्तरावरील पदांसाठी ही परीक्षा घेतली जाते. (Important Notice for CGL Recruitment Applicants Issued by SSC)

SSC ने जारी केल्या CGL भरतीच्या अर्जदारांसाठी महत्त्वाच्या सूचना
BHEL मध्ये इंजिनिअर, सुपरवायझर पदांची भरती! 70 हजारहून जास्त पगार

एसएससी सीजीएल भरती 2021 संबंधित महत्त्वाच्या गोष्टी

या आहेत रिक्त जागा

या भरतीमध्ये केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये सहाय्यक लेखापरीक्षण अधिकारी, सहाय्यक लेखाधिकारी, सहाय्यक विभाग अधिकारी, सहाय्यक, प्राप्तिकर निरीक्षक, निरीक्षक केंद्रीय उत्पादन शुल्क, निरीक्षक प्रतिबंधक अधिकारी, निरीक्षक परीक्षक, सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी, उपनिरीक्षक (सीबीआय) (CBI) या पदांसाठी नियुक्ती करण्यात येणार आहे. निरीक्षक (पोस्ट विभाग आणि सेंट्रल ब्यूरो ऑफ नार्कोटिक्‍स Central Bureau of Narcotics), सहाय्यक / अधीक्षक, विभागीय लेखापाल, कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी, लेखा परीक्षक, वरिष्ठ सचिवीय सहाय्यक, कर सहाय्यक.

वयोमर्यादा

काही पदांसाठी 27, काही पदांसाठी 30 आणि काही पदांसाठी 32 अशी उच्च वयोमर्यादा निश्‍चित करण्यात आली आहे. एससी, एसटी प्रवर्गाला वयात 5 वर्षे आणि ओबीसींना 3 वर्षांची सूट मिळेल.

शैक्षणिक पात्रता (या पात्रता 23 जानेवारी 2022 पर्यंत पूर्ण केली पाहिजे)

कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी : कोणत्याही शाखेतील पदवी, परंतु इयत्ता बारावीमध्ये गणित विषयात किमान 60 टक्के गुण असणे आवश्‍यक आहे किंवा सांख्यिकी विषयासह कोणत्याही प्रवाहात पदवी.

सांख्यिकी अन्वेषक ग्रेड - II : सांख्यिकी विषयासह कोणत्याही प्रवाहात पदवी. उमेदवाराने सर्व तीन वर्षे (किंवा सर्व सहा सेमिस्टर) सांख्यिकी विषयाचा अभ्यास केलेला असावा. कोणत्याही शाखेतील पदवीधर युवक वरील पदांशिवाय इतर सर्व पदांसाठी अर्ज करू शकतात.

SSC ने जारी केल्या CGL भरतीच्या अर्जदारांसाठी महत्त्वाच्या सूचना
रेड झोनमध्ये 13 जिल्हे! शाळा पुन्हा बंद होण्याची शक्‍यता

रिक्त पदे : या भरतीसाठी रिक्त पदांचा तपशील नंतर प्रसिद्ध केला जाईल. अधिसूचनेत रिक्त पदांची संख्या अद्याप जाहीर केलेली नाही.

अर्ज फी : सामान्य आणि ओबीसी - 100 रुपये तर एससी, एसटी, दिव्यांग आणि महिला वर्गाला कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. BHIM UPI, Net Banking, Master Card, Debit, Credit Card, Maestro, Rupee Credit Card, SBI चालानद्वारे फी भरली जाऊ शकते.

महत्त्वाच्या तारखा

  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 जानेवारी 2022 (रात्री 11.30 पर्यंत)

  • ऑनलाइन फी जमा करण्याची शेवटची तारीख : 25 जानेवारी 2022 (रात्री 11.30 पर्यंत)

  • ऑफलाइन चलन तयार करण्याची शेवटची तारीख : 26 जानेवारी 2022 (रात्री 11.30 पर्यंत)

  • चलनाद्वारे फी जमा करण्याची शेवटची तारीख : 27 जानेवारी 2022

  • टियर-I परीक्षा (संगणक आधारित चाचणी) - एप्रिल 2022

निवड प्रक्रिया

टियर-1, टियर-2, टियर-3, टियर-4 परीक्षांमधील कामगिरीवर आधारित निवड केली जाईल. टियर-1 आणि टियर-2 या संगणकावर आधारित परीक्षा असतील. टियर - 3 पेन पेपर मोड (वर्णनात्मक) असेल. टियर-4 कौशल्य चाचणी (संगणक प्रवीणता चाचणी किंवा डेटा एंट्री चाचणी) असेल.

28 जानेवारीपासून केल्या जातील अर्जात दुरुस्त्या

SSC ने जारी केल्या CGL भरतीच्या अर्जदारांसाठी महत्त्वाच्या सूचना
अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयात बंपर भरती! पगार दरमहा अडीच लाख

फोटो अपलोड करताना विशेष लक्ष द्या

यावेळी एसएससीने उमेदवारांना फोटो स्कॅनिंग आणि अपलोड करण्याशी संबंधित नियम स्पष्ट करणारी एक वेगळी अधिसूचना जारी केली आहे. SSC ने म्हटले आहे की स्कॅन केलेला रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटो JPEG स्वरूपात असावा आणि त्याचा आकार 20 KB ते 50 KB दरम्यान असावा. फोटो तीन महिन्यांपेक्षा जुना नसावा. छायाचित्र 3.5 सेमी रुंद आणि 4.5 सेमी लांब असावे. फोटो टोपी, चष्माशिवाय असावा. दोन्ही डोळे स्पष्टपणे दिसले पाहिजेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.