पोस्टाच्या भरतीत बदल; आता 'या' तारखेपर्यंत करता येणार अर्ज

India Post
India Postesakal
Updated on

India Post GDS Recruitment 2021 : भारतीय पोस्ट विभागातील ग्रामीण डाक सेवक (GDS), शाखा पोस्ट मास्टर (BPS) आणि सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर या पदांच्या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आता वाढवण्यात आलीय. ज्या उमेदवारांना उत्तर प्रदेश पोस्टल सर्कल आणि उत्तराखंड पोस्टल सर्कलमध्ये भरतीसाठी अर्ज करायचा आहे, त्यांच्यासाठी ही एक नवी संधी उपलब्ध झालीय.

Summary

पोस्ट विभागात 23 ऑगस्टपासून एकूण 4845 रिक्त जागांवर उमेदवारांच्या भरतीसाठी अर्ज सुरू आहेत.

23 ऑगस्टपासून एकूण 4845 रिक्त जागांवर उमेदवारांच्या भरतीसाठी अर्ज सुरू आहेत. भरतीची अधिसूचना विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर appost.in जारीही करण्यात आलीय. या अर्जाची शेवटची तारीख आधी 23 सप्टेंबर होती. मात्र, आता ती वाढवून 25 सप्टेंबर करण्यात आलीय. विभागानं त्याची माहिती अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली असून ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी अद्याप अर्ज केलेला नाही, ते 25 सप्टेंबरपर्यंत अधिकृत वेबसाइटवर अर्ज करू शकतात.

India Post
परीक्षा, मुलाखतीचं आता 'नो टेन्शन'; पोस्टात 4845 पदांवर थेट भरती

उत्तर प्रदेश पोस्टल सर्कलमधील 4264 रिक्त पदांवर आणि उत्तराखंड पोस्टल सर्कलमध्ये 581 रिक्त जागांवर ही भरती होणार आहे. दरम्यान, उमेदवार वेबसाइटवरून तपशीलवार अधिसूचनाही डाउनलोड करू शकतात. दहावी उत्तीर्ण उमेदवार या पदांसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. अर्ज करण्यासाठी कमाल वयोमर्यादा 40 वर्षे निश्चित करण्यात आलीय. उमेदवारांची 10 वीच्या गुणांच्या आधारे गुणवत्ता तयार केली जाईल, ज्याच्या मदतीनं उमेदवारांची निवड होईल. तसेच या पदांकरिता कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नसल्याचे विभागानं स्पष्ट केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.