India Post : टपाल विभागात पोस्टमनसह अनेक पदांसाठी भरती

India Post Recruitment 2021
India Post Recruitment 2021esakal
Updated on
Summary

दहावी आणि बारावी पास असणाऱ्यांना सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे.

India Post Recruitment 2021 : पोस्ट विभागातील बिहार सर्कलनं (Bihar Circle) त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर indiapost.gov.in 60 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. या भरती प्रक्रियेद्वारे पोस्टल/सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन आणि MTS या पदांची भरती केली जाणार असून ही भरती क्रीडा कोट्यांतर्गत होणार आहे.

अधिकृत अधिसूचनेनुसार (India Post Notification), पोस्टल असिस्टंटची 31 पदे, सॉर्टिंग असिस्टंटची 11 पदे, पोस्टमनची 5 पदे आणि मल्टी टास्किंग स्टाफची 13 पदे रिक्त आहेत. पोस्टल असिस्टंट आणि सॉर्टिंग असिस्टंट या पदांकरिता अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त संस्थेतून 12 वी उत्तीर्ण असावा. तसेच पोस्टमन पदासाठी उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून 12 वी उत्तीर्ण केलेली असावी आणि त्याला स्थानिक भाषेचं ज्ञान असावं. MTS पदासाठी उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून 10 वी उत्तीर्ण असावा व स्थानिक भाषेचंही ज्ञान असणं आवश्यक आहे.

India Post Recruitment 2021
Indian Navy : भारतीय नौदलात 12 वी उत्तीर्णांसाठी थेट भरती

पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट आणि पोस्टमन या पदांकरिता अर्ज करण्यासाठी उमेदवाराची वयोमर्यादा 18 ते 27 वर्षे आहे. MTS पदासाठी उमेदवाराची वयोमर्यादा 18 वर्षे ते 25 वर्षे आहे. 31 डिसेंबर 2021 पासून उमेदवारांचं वय मोजलं जाईल. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार सवलत दिली जाईल. या भरतीसाठी अर्ज करण्याकरिता उमेदवाराने अधिकृत वेबसाइटवर दिलेला फॉर्म भरून विहित पत्त्यावर पाठवावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2021 आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()