बारावी पास झाल्यानंतर भारतीय लष्करात भरती होऊन देशसेवा करण्यासाठी आणि सरकारी नोकरी मिळवण्याची मोठी संधी तरुणांना आहे. बारावी उत्तीर्ण किंवा बारावी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना सैन्यात दाखल होण्याचे अनेक पर्याय आहेत.
कित्येक तरुणाचं सैनिक बनून देशाचं रक्षण करावं, असं स्वप्न असतं. मात्र, सैन्यात नेमकं कसं भरती व्हावं, सैन्याच्या कोणत्या दलात सहभागी व्हावं, त्यासाठी शिक्षण किती? असे प्रश्न अनेक तरुणांच्या मनात घर करुन राहतात. अशाच तरुणांसाठी आज आम्ही महत्त्वपूर्ण माहिती देणार आहोत.
देश सेवेसाठी इच्छूक असणारे तरुण 12 वी किंवा ग्रॅज्युएशननंतर सैन्यदलात दाखल होऊन देशसेवा करु शकतात. पण सैन्यदलात कोणकोणत्या पदासाठी अर्ज दाखल करता येतील, याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.
NDA किंवा NA
तुमचं जर विज्ञान शाखेतून बारावीपर्यंत शिक्षण झालं असेल तर तुम्ही नॅशनल डिफेन्स अकादमी किंवा नौदल अकादमीत अर्ज करु शकता. ही परीक्षा यूनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनकडून वर्षातून दोनवेळा घेतली जाते. त्यापैकी पहिली परीक्षा ही एप्रिल-मे महिन्यात होते. तर दुसरी परीक्षा आक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आयोजित करण्यात येते. या परीक्षेत निवड होणाऱ्या उमेदवारांना नौदल, लष्कर आणि वायू दलात लेफ्टनंट बनवले जाते.
IAFCAT Recruitment
अनेकांची वायू दलात काम करण्याची इच्छा असते. वायू दलाकडून कॉमन अॅडमिशन टेस्ट घेतली जाते. या परीक्षेसाठी कला आणि विज्ञान शाखेतून 12 वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अर्ज दाखल करु शकतात. मात्र, या परीक्षेसाठी वयाची अट आहे. या परीक्षेसाठी 16 ते 19 वयोगटातील विद्यार्थीच अर्ज दाखल करु शकतात.
Indian Army Recruitment Rally
देशभरात सैन्यदलात भरतीसाठी विविध राज्यांमध्ये रॅली आयोजित केली जाते. या रॅली अंतर्गत भारतीय सैन्यात सैनिक पदावर भरती केली जाते. या पदासाठी इच्छूक उमेदवाराचे वय 16 ते 21 वर्ष असणं आवश्यक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.