Agniveer Recruitment : 'अग्निवीर' भरती प्रक्रियेत होणार मोठा बदल; जाणून घ्या सैन्यात कशी मिळवता येणार नोकरी?

भारतीय लष्करानं (Indian Army) अग्निवीर भरती प्रक्रियेत बदल जाहीर केले आहेत.
Agniveer Recruitment Process
Agniveer Recruitment Processesakal
Updated on
Summary

याबाबतची अधिसूचना फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत जारी होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी आज (शनिवार) दिली.

Agniveer Recruitment Process : भारतीय लष्करानं (Indian Army) अग्निवीर भरती प्रक्रियेत बदल जाहीर केले आहेत. आता अग्निवीर भरती अंतर्गत सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना प्रथम ऑनलाइन सामायिक प्रवेश परीक्षा (CEE) द्यावी लागणार आहे.

यानंतर शारीरिक आणि वैद्यकीय चाचण्या होतील. कार्यपद्धतीतील बदलाबाबत लष्कराकडून विविध वृत्तपत्रांमध्ये जाहिराती दिल्या जात आहेत. याबाबतची अधिसूचना फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत जारी होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी आज (शनिवार) दिली.

Agniveer Recruitment Process
Narendra Modi : PM मोदींचा दबदबा कायम; बायडन, सुनकसारख्या नेत्यांना मागं टाकत पुन्हा बनले नंबर 1 नेते

एप्रिलमध्ये होणार पहिली परीक्षा

लष्करातील एका उच्चस्तरीय अधिकाऱ्यानं सांगितलं की, 'पहिली ऑनलाइन सामायिक प्रवेश परीक्षा (Common Entrance Examination CEE) एप्रिलमध्ये घेतली जाईल. देशभरात 200 ठिकाणी ही प्रवेश परीक्षा घेतली जाईल. यासाठी सर्व तयारी अंतिम टप्प्यात आलीये. या परीक्षेमुळं भरतीदरम्यान दिसणारी गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.'

Agniveer Recruitment Process
BJP PM Candidate : PM मोदींनंतर CM योगी पंतप्रधानपदावर दावा करणार? स्वत: दिलं 'हे' खास उत्तर

आता अशी असणार अग्निवीर भरती प्रक्रिया

अग्निवीर भरती प्रक्रियेसाठी आतापर्यंत उमेदवारांना शारीरिक तंदुरुस्ती चाचणी, त्यानंतर वैद्यकीय चाचणी आणि ऑनलाइन सामायिक प्रवेश परीक्षेसाठी (CEE) उपस्थित राहण्याचा अंतिम टप्पा आवश्यक होता. पण, आता ऑनलाइन सामायिक प्रवेश परीक्षा ही पहिली पायरी असणार आहे. ही नवीन प्रक्रिया 2023-24 च्या पुढील भरतीत इच्छुक असलेल्या सुमारे 40,000 उमेदवारांना लागू होईल, असंही सूत्रांकडून कळतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.