खुशखबर! इंडियन आर्मीच्या 'Technical'मध्ये 189 पदांसाठी भरती; 'असा' भरा आजच अर्ज

खुशखबर! इंडियन आर्मीच्या 'Technical'मध्ये 189 पदांसाठी भरती; 'असा' भरा आजच अर्ज
Updated on

Indian Army SSC (Technical) October 2021 : भारतीय लष्कराच्या 'टेक्निकल'मध्ये (indian army ssc technical) भरतीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही चांगली बातमी! अधिकारी प्रशिक्षण अकादमीत (ओटीए) मंगळवारी (ता. 25) 57 व्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन (तांत्रिक) मुख्य कोर्स आणि 28 व्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन (Short service commission) (तांत्रिक) महिला कोर्सच्या एकूण 189 रिक्त जागांवरील भरतीसाठी अर्ज प्रक्रियेची सुरुवात झालीय. दरम्यान, आर्मी एसएससी (Technical) ऑक्टोबर 2021 भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेले उमेदवार भारतीय सैन्य भरती पोर्टलवर joinindianarmy.nic.in ऑनलाइन अर्ज करु शकतात. मात्र, ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख सैन्याने 23 जून 2021 पर्यंत निश्चित केलीय. (indian-army-ssc-technical-recruitment-october-2021-application-started-apply-online-at-joinindianarmy-nic-in)

Summary

Indian Army SSC (Technical) October 2021 : भारतीय लष्कराच्या 'टेक्निकल'मध्ये भरतीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही चांगली बातमी!

अर्ज कसा करावा सबमिट?

प्रारंभी उमेदवारांना सैन्य भरती पोर्टला भेट द्यावी लागेल. त्यानंतर, मुख्यपेजवर दिलेल्या अधिकारी प्रवेश अर्ज / लॉगइनच्या लिंकवर क्लिक करावे लागेल. यानंतर नवीन पेजवरील नव्या नोंदणीसाठीच्या दुव्यावर क्लिक करून, संपूर्ण तपशील भरून नोंदणी करावी लागेल. त्यानंतर, उमेदवाराने नाव, पत्ता व शालेय शिक्षणाची माहिती अर्जात भरुन अर्ज सबमिट करावा.

कोण अर्ज करू शकेल?

भारतीय सैन्यात एसएससी (तांत्रिक) प्रवेश मिळविण्यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून अभियांत्रिकीची पदवी उत्तीर्ण केलेली असावी. अंतिम वर्ष / सेमिस्टरचे विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात. परंतु, त्यांना 1 ऑक्टोबर 2021 पर्यंत पासिंग प्रमाणपत्र सादर करावे लागेल. या व्यतिरिक्त 1 ऑक्टोबर 2021 रोजी उमेदवारांचे वय 20 ते 27 वर्षांदरम्यान असावे. म्हणजे, उमेदवाराचा जन्म 2 ऑक्टोबर 1994 पूर्वी झाला नसावा आणि 1 ऑक्टोबर 2001 नंतरचाही नसावा.

indian army ssc technical recruitment october 2021 application started apply online at joinindianarmy nic in

खुशखबर! इंडियन आर्मीच्या 'Technical'मध्ये 189 पदांसाठी भरती; 'असा' भरा आजच अर्ज
'Air Force'ची कॉमन अ‍ॅडमिशन टेस्ट 1 जूनपासून; 334 पदांसाठी होणार परीक्षा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.