फक्त 2 पानांचा बायोडाटा, अन् थेट Google, Microsoft मध्ये मिळाली नोकरीची संधी, भारतीय वंशाच्या तरुणीची कमाल!

एका भारतीय वंशाच्या मुलीला केवळ 2 पानांच्या रेझ्युमसह केवळ गुगलच नव्हे तर मायक्रोसॉफ्टकडूनही नोकरीची ऑफर मिळाली आहे.
sonakshi pandey
sonakshi pandeySakal
Updated on

भारतीयांमध्ये टॅलेंटची कमतरता नाही ही गोष्ट संपूर्ण जगाला मान्य करावी लागणार आहे. जगभरातील किती भारतीयांनी आपली क्षमता लोकांना पटवून दिली आहे. अशीच एक व्यक्ती म्हणजे सोनाक्षी पांडे. या भारतीय वंशाच्या मुलीला फक्त 2 पानांच्या रेझ्युमसह गुगलच नाही तर मायक्रोसॉफ्टकडूनही नोकरीची ऑफर मिळाली.

सोनाक्षी पांडेने 2013 मध्ये मुंबई विद्यापीठातून संगणक अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त केली. यानंतर तिने टेक्सास डलास विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्समध्ये पदव्युत्तर पदवी घेतली. पदव्युत्तर पदवी पूर्ण केल्यानंतर, तिने ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉनसाठी सॉफ्टवेअर अभियंता म्हणून करिअरला सुरुवात केली. येथे तिने तीन वर्षे कोड लिहिले. सुरुवातीच्या काळात ती खूप लाजाळू होती.

कसे बदलले आयुष्य

एके दिवशी तिने व्हिडिओ स्ट्रीमिंग वेबसाइट यूट्यूबवर एक व्हिडिओ पाहिला. यामध्ये टेक एक्सपर्ट डेटाबेसबद्दल बोलत होते. त्याच्या बोलण्याच्या शैलीतला आत्मविश्वास पाहून ती प्रभावित झाली. बिझनेस इनसाइडरच्या वृत्तानुसार सोनाक्षीने सांगितले की, मला ती व्यक्ती जसे करत होती तसे काहीतरी करायचे होते. मला स्टेजवर जाऊन पूर्ण आत्मविश्वासाने माझी मते लोकांसमोर मांडायची होती.

गुगल आणि मायक्रोसॉफ्टमधून आले ऑफर लेटर

यानंतर तिने आपल्या करिअरची दिशा बदलली आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमधून ॲमेझॉन वेब सर्व्हिसेससह सोल्यूशन आर्किटेक्चरमध्ये प्रवेश केला. या काळात तिने ॲमेझॉनच्या क्लाउड कॉम्प्युटिंग पेजसाठी अनेक ब्लॉगही लिहिले. 2021 मध्ये तिने मायक्रोसॉफ्ट आणि गुगलकडे अर्ज केला होता. सोनाक्षी पांडेने तिचा रेझ्युम देखील शेअर केला आहे, ज्याच्या आधारे तिला गुगल आणि मायक्रोसॉफ्ट दोन्हीकडून नोकरीच्या ऑफर मिळाल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.