जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल, तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे.
Indian Navy Recruitment 2021 : जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल, तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे. इंडियन नेव्हीने (Indian Navy) 10+2 (B.Tech) कॅडेट एंट्री स्कीम कोर्ससाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 1 ऑक्टोबरपासून सुरू केलीय. यासाठी इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइटला joinindiannavy.gov.in भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. 10 ऑक्टोबर 2021 पर्यंत आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार आहे.
या प्रवेशाअंतर्गत एकूण 35 रिक्त जागा भरल्या जाणार असून यात एज्युकेशन ब्रांचसाठी 5 जागा आणि एक्झिक्युटीव्ह अॅण्ड टेक्निकल ब्रांचसाठी 30 जागांचा समावेश आहे. जेईई (बीई/बीटेक) परीक्षा 202 मध्ये सहभागी झालेले आणि ऑल इंडिया रँक जाहीर झालाय ते या कोर्ससाठी अर्ज करण्यास पात्र असतील. उमेदवारांना सिनिअर सेकेंडरी एक्झाम म्हणजेच बारावीत फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्समध्ये किमान 70 टक्के आणि इंग्रजीमध्ये किमान 50 टक्के असणे गरजेचे आहे. उमेदवाराचा जन्म 2 जुलै 2002 आणि 1 जानेवारी 2005 दरम्यान होणे गरजेचे आहे.
अशी होईल निवड प्रक्रिया : जेईई मुख्य परीक्षेमध्ये ऑल इंडिया रॅंकच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. यानंतर SSB मुलाखत आणि वैद्यकीय परीक्षेद्वारे निवड करण्यात येईल. दरम्यान, याबाबतच्या अधिक माहितीसाठी उमेदवारांनी joinindiannavy.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.