Indian Navy Recruitment 2022: भारतीय नौदलाने आर्टिफिशर अप्रेंटिस आणि Senior Secondary Recruitsच्या ऑगस्ट बॅचसाठी अर्ज मागवले आहेत. या अभ्यासक्रमांद्वारे भारतीय नौदलात Seller पोझिशन्स भरती केली जाणार आहे.
Indian Navy Recruitment 2022: भारतीय नौदलाने आर्टिफिशर अप्रेंटिस आणि Senior Secondary Recruitsच्या ऑगस्ट बॅचसाठी अर्ज मागवले आहेत.या अभ्यासक्रमांद्वारे भारतीय नौदलात Seller पोझिशन्स भरती केली जाणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आज म्हणजेच 5 एप्रिल 2022 आहे. इच्छुक उमेदवारा joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन शक्य तितक्या लवकर अर्ज जमा केला पाहिजे.
भरतीसाठी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार,आर्टिफिशर अप्रेंटिसच्या 500 हून अधिक रिक्त जागांसाठी आणि SSR च्या 2000 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक पात्रता
रसायनशास्त्र, जीवशास्त्र किंवा संगणक विज्ञान शाखेतील १२वी उत्तीर्ण उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.
वयोमर्यादा
पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची जन्मतारीख 1 ऑगस्ट 2002 पूर्वीची आणि 31 जुलै 2005 नंतरची नसावी.
निवड प्रक्रिया
या पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी चाचणी आणि शारीरिक प्रवीणता चाचणीद्वारे (Physical Proficiency Test) केली जाईल. भरतीसंबंधी इतर कोणत्याही माहितीसाठी अधिसूचना तपासण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.