भारतीय नौदलानं क्रीडा कोट्यांतर्गत विविध पदांसाठी अधिसूचना जारी केलीय.
Indian Navy Recruitment 2021 : भारतीय नौदलानं क्रीडा कोट्यांतर्गत नाविक (Sailor) पदासाठी अधिसूचना (Notification) जारी केलीय. इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइटद्वारे joinindiannavy.gov.in अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 डिसेंबर 2021 आहे. ईशान्य, जम्मू आणि काश्मीर (Jammu and Kashmir), अंदमान-निकोबार, लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेटांमधील उमेदवारांसाठी अंतिम तारीख 1 जानेवारी 2022 आहे.
अॅथलेटिक्स, एक्वाटिक्स, बास्केटबॉल, बॉक्सिंग, क्रिकेट (Cricket), फुटबॉल, कलात्मक जिम्नॅस्टिक्स, हँडबॉल, हॉकी, कबड्डी, व्हॉलीबॉल, वेटलिफ्टिंग, कुस्ती, स्क्वॅश, तलवारबाजी, गोल्फ, टेनिस, कयाकिंग आणि कॅनोइंगमध्ये पात्र असलेले उमेदवार भारतीय नौदलासाठी अर्ज करू शकतात. शिवाय, आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय खेळातील उमेदवारही अर्ज करण्यास पात्र असतील.
कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतील कोणत्याही प्रवाहात 12 वी उत्तीर्ण असलेला उमेदवार अर्ज करू शकतो. उमेदवारांची वयोमर्यादा किमान 17 वर्षे आणि कमाल 21 वर्षे असावी.
वेतनमान : निवड झाल्यानंतर, सुरुवातीच्या प्रशिक्षण कालावधीत प्रति महिना 14,600 रुपये स्टायपेंड दिलं जाईल. प्रशिक्षणानंतर, उमेदवारांना संरक्षण वेतन मॅट्रिक्स लेव्हल-3 अंतर्गत प्रति महिना 21,700 ते 43,100 पगार मिळेल. शिवाय, 5200 प्रति महिना MSP आणि DA लागू असेल.
पात्र उमेदवार joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज डाउनलोड करू शकतात. दरम्यान, अर्जामध्ये आवश्यक तपशील भरुन संबंधित कागदपत्रांसह अर्ज भारतीय नौदल क्रीडा नियंत्रण मंडळ, एकात्मिक मुख्यालय (नेव्ही) 7 व्या मजल्यावर चाणक्य भवन, नवी दिल्ली - 110021' येथे पाठवावा. स्पीड पोस्ट किंवा कुरियरद्वारे प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असं त्यांनी स्पष्ट केलंय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.