Indian Navy Recruitment : दहावी-बारावीनंतर भारतीय नौदलात नोकरीची संधी, आजच करा अर्ज

भारतीय नौदलाने फायर वॉरियर्ससाठी भरती जाहीर केली आहे
Indian Navy Recruitment
Indian Navy Recruitmentesakal
Updated on

Indian Navy Recruitment :

दहावी बारावी परिक्षेनंतर सरकारी नोकरी मिळू शकेल का? असा प्रश्न कोणी केला तर लोक वेड्यात काढतील. कारण, जास्त शिक्षण घेतलेल्या लोकांनाही सरकारी नोकरी मिळू शकत नाही. पण, आता हे शक्य होणार आहे.

नुकतेच दहावी-बारावी विद्यार्थ्यांचे निकाल लागले आहे. त्या निकालावर सरकारी नोकरी मिळवता येते. त्यासाठी भारतीय नौदलात भरपूर जागा निघाल्या आहेत. त्याबद्दल जाणून घेऊयात.

Indian Navy Recruitment
Job Discrimination : मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा, एचआरने मागितली माफी!

भारतीय नौदलाने फायर वॉरियर्ससाठी भरती जाहीर केली आहे. एमआर आणि वरिष्ठ माध्यमिक भर्ती (एसएसआर) भरतीसाठी अर्ज करू शकतात. ही भरती स्त्री आणि पुरुष दोघांसाठी आहे.

अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. जर तुम्हाला या भरती मोहिमेचा भाग व्हायचे असेल, तर आत्ताच अर्ज करा कारण शेवटची तारीख 4 जून ठेवण्यात आली आहे.

Indian Navy Recruitment
Job Discrimination : मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा, एचआरने मागितली माफी!

अर्ज करण्यासाठी शुल्क किती आहे?

जर तुम्ही 12वी गणित आणि भौतिकशास्त्र या विषयांसह किमान 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण असाल, आणि 50 टक्के गुणांसह 10वी उत्तीर्ण असाल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी, तुम्हाला 550 रुपये शुल्क भरावे लागेल. यासोबतच 18 टक्के जीएसटी भरावा लागणार आहे.

शैक्षणिक पात्रता

50 टक्के गुणांसह अभियांत्रिकी  डिप्लोमा (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/ऑटोमोबाईल/

भौतिकशास्त्र आणि गणिताचा 2 वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम केला असावा

वय मर्यादा जन्म 1 नोव्हेंबर 2003 ते 30 एप्रिल 2007 या काळात जन्म झाला असेल तर अर्ज करू शकतात. तसेच, 4 वर्षांच्या या नोकरीत कोणत्याही उमेदवाराला लग्न करता येणार नाही.

Indian Navy Recruitment
Jobs: 2024मध्ये जवळपास 50 टक्के कर्मचारी नोकरी सोडण्याच्या तयारीत; काय आहे कारण?

वेतन

उमेदरावाला महिन्याला ३० हजार वेतन मिळेल. याशिवाय वैद्यकीय रजाही घेता येईल. युनिफॉर्म आणि प्रवासाचा खर्च वेगळा दिला जाईल.

उमेदरावाला दरवर्षी वेतनवाढही मिळू शकते. भारतीय नौदलाला नोकरी दरम्यान केलेल्या उमेदवाराचा आयुर्विमा देखील मिळेल, ज्यासाठी उमेदवाराला एक रुपयाही भरावा लागणार नाही.

कसा करावा अर्ज

join Indiannavy.gov.in या वेबसाईटवर जा

तिथे ऍप्लिकेशनवर क्लिक करा

महत्त्वाचे डिटेल्स भरा

सोबत तुमचे महत्त्वाची कागदपत्रांचे PDF जोडा

तसेच फिज भरा आणि फॉर्म सबमिट करा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.