इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने नॉन एक्झिक्युटिव्ह 513 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे.
सोलापूर : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Oil Corporation Limited - IOCL) ने नॉन एक्झिक्युटिव्ह (Non-executive) पदांच्या भरतीसाठी (Recruitment) अधिसूचना जारी केली आहे. या अंतर्गत एकूण 513 पदांची भरती केली जाईल. इच्छुक आणि पात्र उमेदवार जे या पदांसाठी अर्ज करू इच्छितात ते IOCL ची अधिकृत वेबसाईट iocl.com द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया 21 सप्टेंबर 2021 पासून सुरू झाली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2021 पर्यंत आहे.
या तारखा लक्षात ठेवा
ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख : 21 सप्टेंबर 2021
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 ऑक्टोबर 2021
कागदपत्रांसह ऑनलाइन अर्जाच्या प्रिंटआउटची तारीख : 23 ऑक्टोबर 2021
लेखी परीक्षेची संभाव्य तारीख : 24 ऑक्टोबर 2021
लेखी परीक्षेचा निकाल प्रकाशित करण्याची तात्पुरती तारीख : 11 नोव्हेंबर 2021
असा करा ऑनलाइन अर्ज
उमेदवारांनी प्रथम IOCL ची अधिकृत साइट iocl.com वर भेट द्यावी. त्यानंतर "करिअर लिंक'वर क्लिक करा आणि नंतर "रिक्रूटमेंट ओपनिंग' लिंकवर क्लिक करा. आता एक नवीन पेज उघडेल जिथे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी नॉन एक्झिक्युटिव्ह पदांच्या लिंकवर क्लिक करावे लागेल. त्या पेजवर दिलेल्या यादीतून विषय निवडा आणि पुढे जा. आवश्यक तपशील आणि अर्ज फी भरा. एकदा पूर्ण झाल्यावर सबमिटवर क्लिक करा. त्यानंतर तुमचा अर्ज सबमिट होईल. पुष्टीकरण पेज डाउनलोड करा आणि पुढील गरजांसाठी त्याची हार्ड कॉपी ठेवा.
उमेदवारांनी लक्षात घ्यावे की, अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानुसार अर्ज करावा; कारण जर फॉर्ममध्ये काही विसंगती आढळली तर अर्ज नाकारला जाईल. या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.