इंडियन ऑईलमध्ये 1900 अप्रेंटिस पदांची भरती! जाणून घ्या पात्रता

इंडियन ऑईलमध्ये 1900 अप्रेंटिस पदांची भरती! जाणून घ्या पात्रता
indian oil recruitment
indian oil recruitmentesakal
Updated on
Summary

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड या भारतातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने विविध रिफायनरीजमध्ये अप्रेंटिसच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

सोलापूर : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Oil Corporation Limited - IOCL) या भारतातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने मथुरा (Mathura), पानिपत (Panipat), हल्दिया, बरौनी आणि इतर ठिकाणी असलेल्या रिफायनरीजमध्ये अप्रेंटिसच्या भरतीसाठी (Recruitment) जाहिरात प्रसिद्ध केली आहे. कॉर्पोरेशनने जारी केलेल्या जाहिरातीनुसार ट्रेड अप्रेंटिस (अटेंडंट ऑपरेटर, फिटर, बॉयलर, सेक्रेटरीअल असिस्टंट, अकाउंटंट, डेटा एंट्री ऑपरेटर - फ्रेशर आणि स्किल सर्टिफिकेट होल्डर) आणि टेक्‍निशियन अप्रेंटिस (केमिकल, मेकॅनिकल, इलेक्‍ट्रिकल आणि इन्स्ट्रुमेंटेशन) अशा एकूण 1900 रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत.

indian oil recruitment
UGC मध्ये NET पात्र उमेदवारांना नोकरीची संधी! 80 हजार रुपये वेतन

असा करा अर्ज

IOCL प्रशिक्षणार्थीसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे आणि उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी अधिकृत भरती पोर्टल iocrefrecruit.in ला भेट देणे आवश्‍यक आहे. यानंतर मेन पेजवर दिलेल्या थेट लिंकवरून ऍप्लिकेशन पेजवर जाऊ शकता. उमेदवारांनी लक्षात घ्यावे की, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 22 ऑक्‍टोबर 2021 पासून सुरू झाली आहे आणि उमेदवार 12 नोव्हेंबर 2021 पर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करू शकतील.

IOCL अप्रेंटिसशिपसाठी हे आहेत पात्रतेचे निकष

IOCL अप्रेंटिसशिपद्वारे प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार, तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळाकडून संबंधित ट्रेडमधून पूर्ण वेळ डिप्लोमासह 10+2 पूर्ण केले पाहिजे. तर, ट्रेड अप्रेंटिससाठी मान्यताप्राप्त संस्थेतून पूर्णवेळ पदवी तर डेटा एंट्री ऑपरेटरसाठी किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्‍यक आहे. सर्व रिक्त पदांसाठी 1 ऑक्‍टोबर 2021 रोजी उमेदवारांचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 24 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.