Railway Recruitment : रेल्वेची 12वी पासून ग्रॅज्युएशन पासपर्यंत  मेगाभरती , 10884 पदांवर अशा प्रकारे होणार निवड! पगार किती मिळणार?

Indian Railway Jobs: उमेदवारांना १२ वी पास किंवा पदवीधर असणे आवश्यक आहे. अंडरग्रॅज्युएट पदांसाठी वयोमर्यादा १८ ते ३० वर्षे असून, पदवीधर पदांसाठी वयोमर्यादा १८ ते ३३ वर्षे आहे.
Railway Recruitment news
Railway Recruitment news esakal
Updated on

रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. २०२४ मध्ये रेल्वे भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. रेल्वेकडून १० हजार ८४४ पदांसाठी मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी १२ वी पास तसेच पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात.

आरआरबी एनटीपीसी अंतर्गत १० हजार ८४४ पदांची भरती केली जाणार आहे. हे पदे लेवल २, ३, ५ आणि ६ मध्ये आहेत. यात जूनियर क्लर्क, अकाउंट्स क्लर्क, टाइम कीपर, सीनियर क्लर्क, जूनियर अकाउंट असिस्टेंट, गुड्स गार्ड, कमर्शियल अप्रेंटिस, स्टेशन मास्टर यांसारख्या पदांचा समावेश आहे. हे सर्व पदे नॉन-टेक्निकल कॅटेगरीतील आहेत.

अर्ज कोण करु शकतो-

उमेदवारांना १२ वी पास किंवा पदवीधर असणे आवश्यक आहे. अंडरग्रॅज्युएट पदांसाठी वयोमर्यादा १८ ते ३० वर्षे असून, पदवीधर पदांसाठी वयोमर्यादा १८ ते ३३ वर्षे आहे.

पदांचा तपशील-

  • अंडरग्रॅज्युएट पदे: ३४०४ पदे

  • जूनियर क्लर्क कम टायपिस्ट: ९९० पदे

  • अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट: ३६१ पदे

  • ट्रेन्स क्लर्क: ६८ पदे

  • कमर्शियल कम टिकट क्लर्क: १९८५ पदे

  • ग्रॅज्युएट पदे: ७४७९ पदे

  • गुड्स ट्रेन मॅनेजर: २६८४ पदे

  • चीफ कमर्शियल कम टिकट सुपरवायझर: १७३७ पदे

  • सीनियर क्लर्क कम टायपिस्ट: ७२५ पदे

  • जूनियर अकाउंट असिस्टेंट कम टायपिस्ट: १३७१ पदे

  • स्टेशन मास्टर: ९६३ पदे

Railway Recruitment news
Post Office Recruitment : राज्यात ३ हजार १७० डाकसेवकांची भरती; अर्जासाठी पाच ऑगस्टपर्यंत मुदत

निवड प्रक्रिया-

निवड प्रक्रिया विविध परीक्षा व मुलाखतींच्या माध्यमातून होईल. स्टेशन मास्टर व ट्रॅफिक असिस्टेंट पदांसाठी CBT 1, 2, CBAT, डॉक्यूमेंट व्हेरिफिकेशन व मेडिकल एग्झामिनेशन पार करावे लागेल. इतर पदांसाठीही त्यानुसार परीक्षा होतील.

अर्ज शुल्क-

सर्वसाधारण व ओबीसी वर्गासाठी ५०० रुपये शुल्क आहे. एससी, एसटी, एक्स-सर्विसमॅन, पीएच, महिला, ईडब्ल्यूएस वर्गासाठी २५० रुपये शुल्क आहे. काही प्रमाणात शुल्क परत केले जाईल.

पगार-

अंडर ग्रॅज्युएट पदांसाठी पगार १९,९०० रुपये ते २१,७०० रुपये, तर ग्रॅज्युएट पदांसाठी पगार २५,५०० रुपये ते ३५,४०० रुपये असेल. याशिवाय अन्य सुविधाही मिळतील.

अर्जासाठी वेबसाइट-

अर्ज करण्यासाठी व अधिक माहिती मिळवण्यासाठी indianrailways.gov.in या वेबसाइटला भेट द्या. रजिस्ट्रेशनची तारीख लवकरच जाहीर केली जाईल.

Railway Recruitment news
UPSC Success Story : गुगलची लाखोंची नोकरी सोडली अन् बनला युपीएससी टॉपर ; ना टिना डाबी ना सृष्टी देशमुख, कोण आहे हा IAS अधिकारी?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.