Foreign : परदेशात भारतीय कामगारांसाठी मागणी वाढली, 10 वी नापास झालेल्यांनाही संधी

जगातील अनेक देशांमध्ये भारतीय कामगारांची मागणी वाढत आहे.
Foreign : परदेशात भारतीय कामगारांसाठी मागणी वाढली, 10 वी नापास झालेल्यांनाही संधी
Updated on
Summary

जगातील अनेक देशांमध्ये भारतीय कामगारांची मागणी वाढत आहे.

भारतातील अनेक नागरिकांना बऱ्याचजा परदेशात जाण्याची इच्छा असते. त्यांना तेथील वातावरण, संस्कृती आणि अनेक गोष्टी पहायच्या किंवा अनुभवायच्या असतात. मात्र बहुतेकांना पैसे मिळवण्यासाठी मोठ्या देशांमध्ये जायचे असते. भारतातील काही राज्यांत अशीही लोक आहेत जे परदेशी जाण्यासाठी कोणतीही जोखीम उचलण्यासाठी तयार असतात. अशा लोकांसाठी एक खुशखबर आहे. जगातील अनेक देशांमध्ये भारतीय कामगारांची मागणी वाढत आहे. त्यामुळे अशा लोकांना आता परदेशात जॉबसाठी संधी मिळू शकते.

18 देशांमध्ये भारतीयांची मागणी वाढली

जगातील 18 देशांमध्ये भारतीय कामगारांची मागणी वाढली आहे. त्यामुळे लोकांचे परदेशात जाण्याचे आकडे वाढत आहेत. कोरोनानंतर परदेशात गेलेल्या लोकांची संख्या कोरोनापूर्वी परदेशात गेलेल्या लोकांपेक्षा दुपटीने वाढली आहे. कोरोनानंतर जगभरातील देशांच्या अर्थव्यवस्था पुन्हा एकदा मार्गावर येताना दिसत आहेत. त्यामुळे जगातील मोठमोठ्या बाजारपेठेत आता भारतीय कामगारांची मागणी वाढू लागली आहे.

Foreign : परदेशात भारतीय कामगारांसाठी मागणी वाढली, 10 वी नापास झालेल्यांनाही संधी
जळलेली भांडी साफ करण्यासाठी कांद्याचा होईल वापर; कसा ते पाहा...

परदेशातील लोकांना फायदा होईल

परदेशात काम केल्याने केवळ भारतीयांनाच नाही तर ते ज्या देशात राहतात देशालाही फायदा होतो. परदेशातील भारतीय नोकरदार लोक घरी म्हणजेच भारतात पैसे पाठवताना त्याचा फायदा परदेशातील सरकारला होत असतो. एका अहवालानुसार, परदेशात राहणाऱ्या भारतीय लोकांनी मागील वर्षी त्यांच्या देशात 87 डॉलर अब्ज पाठवले होते. त्यामुळे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अहवालात असे म्हटलंय की, परदेशातून भारतीय नागरिकांनी पाठवलेल्या पैशाच्या बाबतीत भारत अव्वल आहे.

परदेशी जाणाऱ्यांची संख्या दुपटीने वाढली

परराष्ट्र मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, कोरोनापूर्वी 2019 मध्ये परदेशात नोकरीसाठी जाणाऱ्या भारतीयांची संख्या 94 हजार होती. कोरोनानंतर या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. आता परदेशात जाणाऱ्या भारतीय कामगारांची संख्या 1.90 लाख झाली आहे. त्यामुळे अशा १८ विदेशी देशांमध्ये जाणाऱ्या भारतीय कामगारांची संख्या वाढली आहे. मात्र येथे प्रवास करण्यासाठी भारतीयांना इमिग्रेशन चेक आणि पासपोर्ट आवश्यक आहे.

Foreign : परदेशात भारतीय कामगारांसाठी मागणी वाढली, 10 वी नापास झालेल्यांनाही संधी
१९९२ मध्ये दहशतवाद्यांना आव्हान देत मोदींनी काश्मीरच्या लाल चौकात फडकवलेला तिरंगा

दरम्यान, ECR पासपोर्ट हा जो दहावीपर्यंत शिकलेल्या कामगारांना दिला जातो. ECR पासपोर्ट जारी करण्यापूर्वी पासपोर्ट कार्यालयाकडून एक विशेष स्टॅम्प लावला जातो. हे पासपोर्ट असलेले भारतीय कामगार ECNR श्रेणीत येतात. ईसीआर पासपोर्ट असलेल्या कामगारांसाठी कामाचे नियम कठोर नाहीत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()