दखल
प्रा. डॉ. गणेश मा. काकांडीकर
अंतराळ क्षेत्राची जागतिक अर्थव्यवस्था २०३५ मध्ये १.८ ट्रिलियन अमेरिकन डॉलर इतकी होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. ती २०२३ मध्ये केवळ ६३० अब्ज डॉलर होती. २०३३ मध्ये ४४ अब्ज अमेरिकी डॉलर करण्याचे ध्येय भारताने ठेवले आहे, पण आजची साधारण झेप १० अब्ज अमेरिकन डॉलर इतकी आहे. हे ध्येय आपण गाठू शकलो, तर अंतराळ अर्थव्यवस्थेत जागतिक स्तरावर आपला हिस्सा ८ टक्के एवढा असेल.