सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. इंटेलिजेंस ब्युरो (IB) ने असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसरच्या (ACIO) 150 जागांसाठी अर्ज मागवले आहेत. या रिक्त पदांशी संबंधित जाहिरात IB ने काल म्हणजेच 16 एप्रिल 2022 रोजी जारी केली आहे. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करावे लागतील. इंटेलिजन्स ब्युरो या भरती अंतर्गत ग्रेड-2/टेक्निकल अंतर्गत ACIO पदांची भरती करणार आहे. यामध्ये कंप्युटर सायन्स आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील 56 पदे आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन स्ट्रीम मधील 94 पदे रिक्त आहेत, जी इंटलिजन्स ब्युरो या भरतीअंतर्गत भरणार आहे. (Intelligence Bureau invited applications for the Assistant Central Intelligence Officer vacancies)
महत्वाच्या तारखा-
1. अर्ज प्रक्रियेची सुरुवातीची तारीख - 16 एप्रिल 2022
2. अर्ज करण्याची शेवटची तारीख - 7 मे 2022
पात्रता-
या पदासाठी अर्ज करणार्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा इतर कोणत्याही तांत्रिक शिक्षण संस्थेतून संबंधित ट्रेडमध्ये BE किंवा B.Tech पदवी प्राप्त केलेली असावी. याशिवाय उमेदवाराकडे इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन किंवा कॉम्प्युटरसह भौतिकशास्त्रात पदव्युत्तर पदवी (मास्टर्स डिग्री)असणे आवश्यक आहे. कंप्युटर अॅप्लिकेशन मध्ये पदव्युत्तर पदवी असलेले उमेदवार देखील या पदासाठी अर्ज करू शकतात. यासोबतच उमेदवाराला संबंधित विषयातील 2020, 2021 किंवा 2022 ची GATE परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे.
वयोमर्यादा-
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 7 मे 2022 रोजी 18 ते 27 वर्षांच्या दरम्यान असावे.
शुल्क-
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तथापि, उमेदवार SBI चलनाद्वारेदेखील अर्ज शुल्क भरू शकतात.
असा अर्ज करा-
असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर पदासाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना गृह मंत्रालयाच्या www.mha.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. उमेदवार तेथे दिलेल्या ऑनलाइन अॅप्लिकेशन फॉर्मद्वारे अर्ज करू शकतील. उमेदवार नॅशनल करिअर सर्व्हिस पोर्टलच्या, ncs.gov.in वेबसाइटला भेट देऊन देखील अर्ज करू शकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.