परदेशातील कॉलेजमध्ये स्टायपेंड कशी मिळते; जाणून घ्या काही सविस्तर

परदेशातील कॉलेजमध्ये स्टायपेंड कशी मिळते; जाणून घ्या काही सविस्तर
Updated on

मुंबई : परदेशात शिक्षण घेतांना सगळ्यात मोठा अडथळा असतो तो म्हणजे लागणाऱ्या भरमसाट फीचा. अमेरिकेसारख्या देशात शिकायला गेल्यानंतर दोन वर्षांचा पदवी किंवा मास्टर्स अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी लागणारी ट्यूशन फी आणि राहण्याचा खर्च सुमारे ४० ते ५० लाखांपर्यंत जातो. हा खर्च इतर काही घटकांनुसार कमी-जास्त होतो. अमेरिकेतील सर्व विद्यापीठे स्वायत्त असल्याने त्यांचे स्वतःचे ट्यूशन फी स्ट्रक्चर आहे व ते त्यांना हवे तेव्हा बदलले जाते. त्यामुळे कोणत्याही दोन विद्यापीठांतील दोन विविध अभ्यासक्रमांची फी एकसारखी कधीच नसते. 

विद्यापीठांची फी त्यांनी मूलभूत सुविधा विकसित करण्यासाठी केलेली गुंतवणूक व त्याचप्रमाणे त्यांनी निवडलेल्या शिक्षकांवर अवलंबून असते. बहुतांश विद्यापीठे त्यांना मिळालेल्या खासगी व सार्वजनिक निधीवर अवलंबून असतात. विद्यार्थी व शिक्षकांसाठी विद्यापीठाने कोणत्या संशोधन सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, हे प्रवेश घेताना तपासणे आवश्यक ठरते. 

निरिक्षणांतून असे आढळून आले आहे, की संशोधनासाठी चांगल्या सुविधा उपलब्ध असल्यास त्या विद्यापीठात दर्जेदार शिक्षक जातात आणि त्यामुळेच त्या विद्यापीठाचे रेटिंगमध्येही सुधारणा झाली. विद्यापीठाने संशोधनासाठी केलेली गुंतवणूक जितकी जास्त, तेवढी त्या विद्यापीठाची फी जास्त, असे एकंदरीत गणित असते. 

अशा विद्यापीठातून शिक्षण घेतल्यास विद्यार्थ्यांना त्यांना हव्या त्या क्षेत्रात जम बसवण्याची संधीही अधिक असते. विद्यापीठात चांगल्या संशोधन संधी असल्याचा आणखी फायदा म्हणजे विद्यार्थ्यांना त्याच विद्यापीठात पुढील संशोधन करता येते किंवा शिक्षक म्हणून कामही करता येते. एखाद्या विद्यार्थ्याला अशी संधी मिळाल्यास विद्यापीठ त्याला स्टायपेंडही देते व यातून विद्यार्थ्याचा राहण्याचा सर्व खर्च व सेमिस्टरची ट्यूशन फीसुद्धा भरून निघते.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.