IOCL Recruitment 2023 : दहावी पास उमेदवारांसाठी इंडियन ऑईलमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, १,८२० पदांवर भरती सुरू

विशेष म्हणजे ही भरती राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये केली जाईल.
IOCL Recruitment 2023
IOCL Recruitment 2023 esakal
Updated on

IOCL Recruitment 2023 : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) मध्ये नुकतीच बंपर भरती सुरू करण्यात आली आहे. IOCL तर्फे टेक्निशियन, पदवीधर आणि ट्रेड अप्रेंटिसच्या १८२० पदांसाठी ही भरती सुरू करण्यात आली आहे.

या पदांसाठी पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ही भरती राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये केली जाईल. जर तुम्ही इंडियन ऑईलमध्ये निघालेल्या या पदांसाठी इच्छुक असाल तर इंडियन ऑईलच्या अधिकृत वेबसाईटवर iocl.com भेट द्या.

या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. सध्या ही ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही. ही ऑनलाईन अर्जाची लिंक १६ डिसेंबर अर्थात उद्यापासून सुरू होणार असून ही लिंक ५ जानेवारी २०२४ पर्यंत सक्रिय असेल. त्यामुळे, या दरम्यान तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता.

IOCL Recruitment 2023
Career Tips : ग्राफिक डिझायनिंगचे क्षेत्र खुणावतेय? मग, तुम्ही करायलाच हवेत 'हे' टॉप कोर्स

या पदांसाठी उमेदवारांची निवड कशी केली जाणार ?

इंडियन ऑईलमधील या पदांवर उमेदवारांची निवड ही ऑनलाईन परिक्षेच्या माध्यमातून केली जाईल. ही परिक्षा multiple choice या प्रकारची आणि वस्तूनिष्ठ स्वरूपाची असेल. इंडियन ऑईलच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्हाला या संदर्भात अधिकची माहिती मिळू शकेल.

या ऑनलाईन परिक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे आणि अधिसूचित पात्रता निकषांची पूर्तता केल्यानंतर उमेदवारांची निवड करण्यात येईल. त्यानंतर, उमेदवारांना कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी बोलावण्यात येईल.

या पदांसाठी शैक्षणिक पात्रता आणि वय

इंडियन ऑईलमधील या पदांवर अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यासोबतच, उमेदवाराने संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय डिप्लोमा केलेला असावा.

इंडियन ऑईलमधील या रिक्त जागा ट्रेड, ग्रॅज्युएट आणि टेक्निकल अप्रेंटिसच्या पदासांठी आहेत. पात्रतेशी संबंधित आणि या भरती संदर्भातील अधिकची माहिती मिळवण्यासाठी तुम्ही इंडियन ऑईलच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.

इंडियन ऑईलमधील या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवाराचे वय हे १८ ते २४ वर्षांच्या दरम्यान असावे. तसेच, आरक्षित प्रवर्गाला सरकारी नियमांनुसार वयामध्ये सवलत मिळेल.

IOCL Recruitment 2023
UCO Bank Jobs 2023 : युको बॅंकेत स्पेशालिस्ट ऑफिसरच्या पदांसाठी भरती सुरू,असा करा अर्ज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.